महाराष्ट्र राजकारण

जावयानंतर एकनाथ खडसेंनाही अटकेची शक्यता ;सात तासापासून इडीकडून चौकशी


मुंबई, -भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीचं घड्याळं हातात बांधलेल्या एकनाथ खडसेंना ईडीनं मोठा झटका दिला आहे. जावई गिरीश चौधरींच्या अटकेनंतर एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) समन्स बजावला चौकशीला बोलविण्या आले आहे. गेल्या सात तासापासून चौकशी सुरू असून जावाईनंतर एकनाथ खडसेंचीही अटक होण्याची दाड शक्यात नाकारता येत नाही.
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेते आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मागे ईडीच्या तपासाचा ससेमिरा लागल्याचं पाहायला मिळत आहे. अनिल देशमुख, प्रताप सरनाईक यांच्यानंतर आता एकनाथ खडसेंकडे ईडीनं मोर्चा वळवला आहे. भोसरी जमिन घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरींना ईडीनं अटक केल्यानंतर एकनाथ खडसेंना चौकशी साठी बोलविण्यात आले आहे. तब्बल सात तासापासून त्याच्यावर कसून चौकशी चालू असून त्यांनाही अटक होण्याची शक्यता दर्शविली जात आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!