बीड

आता 31 जुलैपर्यंत करता येणार पीक कर्जाचा भरणा, कर्जाची परतफेड करून शेतकर्‍यांनी व्याज सवलत योजनेचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी

बीड, दि. 4 (लोकाशा न्यूज) : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, व्यापारी बँकांमार्फत शेतकर्‍यांना पीक कर्जपुरवठा करण्यात येतो. जे शेतकरी बँकाकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड दि. 30 जूनपर्यंत करतात, अशा शेतकर्‍यांना पीक कर्जाची विहित मुदतीत परतफेड करण्यासाठी व्याजामध्ये प्रोत्साहनपर सवलत देण्यासाठी डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राबविण्यात येते. राज्यात एप्रिल व मे 2021 मध्ये उद्भवलेल्या कोविड -19 च्या परिस्थितीमुळे लागू केलेल्या टाळेबंदीच्या कालावधीत शेतकर्‍यांना शेतमालाच्या विक्री व्यवस्थेतील अडचणी आणि साखर कारखान्यांकडून शेतकन्यांना अद्याप देय असलेली एफआरपी विचारात घेता दि. 1 जुलै, 2021 रोजीचे शासन निर्णयाद्वारे राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, व्यापारी बँकांनी शेतकर्‍यांना सन 2020-21 या वर्षात दिलेल्या पीक कर्जाच्या वसुलीस दि.31 जुलै, 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या वाढीव मुदतीत पीक कर्जाची परतफेड करणारे शेतकरी हे डॉ . पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ मिळण्यास पात्र असतील. तेव्हा सर्व पात्र शेतकर्‍यांनी त्यांच्या गत वर्षी घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड दि.31 जुलै , 2021 पर्यंत संबंधित बँक शाखेमध्ये करून डॉ . पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी केले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!