बीड – श्रावनाच्या कथेने भारत वर्षाचे कान तृप्त झाले आहेत मात्र कलयुगात श्रावणबाळ योजना आहे , श्रावण नाहीत . मुलाने आई वडिलांची सेवा न करणे ऐकण्यात होते मात्र बीड जिल्ह्याच्या भूमीत आई वडिलांना मारहाण करणारा लाल देखील निपजला असल्याचे समोर आले आहे , लेक म्हणून माणुसकीला डाग असल्याचे समोर आले. तालुका शिरूर मधील गुंडाने लेक असण्याला डाग लावला आहे.
घाटशिळ पारगाव येथील आबासाहेब खेडकर यांनी जन्म देणार्या आई वडिलांना बेदम मारहाण केल्याची घटना काल घडली. सदरील निर्दयी घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून सर्व स्तरातून खेडकर यांच्या बद्दल संताप व्यक्त केला जात आहे. एका बाजूने आई वडिलांची सेवा शिकवनार्या व्यवस्थेत आबासाहेब सारखे नराधम देखील वाढीस लागले आहेत जे जन्म देणार्या कुसेवर वार करत आहेत . आई वडिलांना बेदम मारहाण केले असल्याने त्यांना अहमद नगर येथील खाजगी दवाखान्यात हलवल्याचे समजते आहे . शिरूर पोलीस ठाण्यात संपर्क केला असता अद्याप गुन्हा दाखल केला नसल्याचे म्हटले आहे.