बीड

बीडसह बाहेरील जिल्ह्यातील वाहने चोरी करणारी टोळी गजाआड, एलसीबीचे पोलिस निरीक्षक भारत राऊत यांच्या पथकाची मोठी कारवाई, तेरा लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल केल्या जप्त


बीड, दि. 11 (लोकाशा न्यूज) : बीड जिल्ह्यासह बाहेरील जिल्ह्यातील वाहने चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भारत राऊत आणि त्यांच्या संपूर्ण टिमने गजाआड केली आहे. यावेळी दोन चार चाकी आणि आठ दुचाक्या असा एकूण 13 लाख 40 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यात मागच्या काही दिवासांपासुन मोटार सायकल चोरी जाण्याचे प्रमाण वाढल्याने पोलीस अधीक्षक राजा रामा स्वामी यांनी स्थानिक गुन्हे शाखाचे पोलिस निरीक्षक भारत राऊत यांना यांना सदर प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सुचना दिल्या होत्या. अशा प्रकारच्या गुन्हयाच्या संदर्भाने आरोपी बाबत माहिती घेत असताना पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, माजलगाव ग्रामीण गु.र.न 02/2021 कलम 379 भादवि व गुरन 185/2020 कलम 379 भादविमधील पाच महिण्यापुर्वी चोरी गेलेल्या मोटार सायकल इसम नामे विष्णु भगवान केकाण (रा.चाटगाव ता. धारुर) व त्याचा एका साथीदाराने चोरुन नेली असुन विष्णु केकाण सध्या त्याचे घरी आला आहे, अशी खात्रीलायक बातमी मिळाले वरुन स्थानिक गुन्हे शाखा, बीड येथील अधिकारी व कर्मचारी यांना नेमुन चाटगाव (ता. धारुर) येथे जाऊन विष्णु भगवान केकाण यास शिताफिने ताब्यात घेऊन त्यास पात्रुड (ता. माजलगाव) येथुन चोरुन आणलेल्या व इतर ठिकाणी चोरलेल्या वाहनाबाबत विचारपुस केली, यावेळी त्याने सांगितले की, तो व त्याचा साथीदारा दोघे सोबत जाऊन पात्रुड (ता.माजलगाव), लातुर, लोणावळा (जि.पुणे), औंढा (जि. हिंगोली) येथुन दोन चाकी, चारचाकी वाहने चोरी केल्याचे सागितले. त्याचेकडुन तीन मोटार सायकल, बोलेरो पिकअप, टाटा सुमो अशी चार चाकी व दुचाकी वाहने मिळाली. तसेच त्याचे इतर फरार साथीदार राजेंद्र अशोक शेळके आणि शेख कलीम हुसेन यांचे कडुन पाच मोटार सायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत. सदर तीन आरोपी यांचेकडुन गुन्हयातील चोरी केलेल्या 08 मोटरसायकल, 01 टाटा सुमो, 01 पिकअप बोलेरो असा एकुण 13,40,000 / – रुपये किंमती मुद्येमाल जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या वाहनाचे संदर्भाने बीड जिल्हयातील माजलगांव ग्रामीण पोस्टेला 02 गुन्हे, लातुर जिल्हयातील चखऊउ व विवेकानंद चौक पोलीस स्टेशनला 03 गुन्हे, पुणे जिल्हयातील लोणावळा पो . स्टे . ला 01 गुन्हा व हिंगोली जिल्हयातील औंढा नागनाथ पो.स्टे.ला 01 गुन्हा असुन एकुण 07 वाहन चोरीचे गुन्हे उघड केले आहेत. 1 ) हिरो होन्डा कंपनीची स्पेल्डर जिचा चेसि.नं. 01ङ20ऋ07803 इंजि . नं . 01घ18ए44728 2 ) बजाज कंपनीची प्लसर मोटार सायकल जिचा चेसीस नंबर चऊ2ऊडऊगननझउऊ19310 वरील दोन वाहनांचे संदर्भाने दाखल गुन्हे संदर्भात माहिती घेणे चालु आहे . वरील प्रमाणे 02 चार चाकी व 08 दुचाकी वाहने व 03 आरोपी पुढील तपासकामी पो.स्टे . माजलगांव ग्रामीण येथे हजर केले आहेत. पुढील तपास माजलगांव ग्रामीण पोलीस करीत आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!