अंमळनेर (लोकाशा न्युज) अंमळनेर पोलीस ठाणे हद्दीतील पिंपळवंडी जवळ असणाऱ्या अंबेवाडी येथील अंकुश जगताप यांची मुलगी वर्षा जगताप वय 12 वर्षे हि खेळत असतांना विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान घडली. यामुळे पिंपळवंडी अमळनेर परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे घटनास्थळी अंमळनेर पोलीस ठाण्याचे ठाणे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांनी तात्काळ धाव घेतली होती.
अंमळनेर पोलीस ठाणे अंमलदार कागदे यांच्या कडून मिळालेली अधिक माहिती अशी कि अंबेवाडी येथील वर्षा अंकुश जगताप वय 12 वर्षे हि खेळत असतांना घराजवळच्या विहीरीत पडली वर्षा हिचा मृतदेह दोन तासानंतर विहीरीतुन बाहेर काढण्यास यश मिळाले होते परंतु हे प्रयत्न निष्फळ ठरले .
अंबेवाडी येथे विहीरीत बालीका पडल्याची माहिती अंमळनेर पोलीस ठाण्याचे ठाणे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांना कळताच त्यांच्या सह पोलीस कर्मचारी बदाम आडसुळ ,विलास गुंडाळे ,प्रभाकर खोले यांनी अंबेवाडी या ठिकाणी जाऊन तेथील नागरीकांच्या मदतीने विहिरीत पडलेल्या बालिकेला शोधण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता.
वर्षा हिचे मामा बाबुराव आजिनाथ शिंदे रा.हंडेवाडी यांनी अंमळनेर पोलीस ठाण्यात खबर दिली होती .मयत वर्षा हिचे पीएम अंमळनेर आरोग्य केंद्रात करण्यात आले .
अंबेवाडी येथील बालिका पाण्यात बुडून मृत्यू झाला होता अंबेवाडी येथील युवकांनी बालिकेचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यासाठी अथक परिश्रम घेतले होते परंतु त्यांना यश आले नव्हते परंतु अंमळनेर पोलीस ठाण्याचे ठाणे प्रमुख शामकुमार डोंगरे यांनी कोतन येथील रावसाहेब माळी यांना बोलावून घेतले माळी यांनी अवघ्या दोन बुडीतच बालिकेचा मृतदेह विहिरीबाहेर काढला होता.