ुुगेवराई, दि. 28 (लोकाशा न्यूज) : शौचास गेलेल्या एका महिलेस पाठीमागून आलेल्या एका इसमाने महिलेला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देऊन गावापासून दोन कि.मी.अंतरावर ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्यावर दुसर्या दिवशी संध्याकाळी तिला गावात आणून सोडले. ही घटना दि.13 मे रोजी संध्याकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास गेवराई तालुक्यातील जव्हारवाडी येथे घडली असून या प्रकरणी दि.27 मे रोजी गेवराई पोलीस ठाण्यात आरोपी विरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दि.28 शुक्रवारी रोजी दुपारी आरोपीला अटक करण्यात आली आहे.
गेवराई तालुक्यातील जव्हारवाडी येथील एक 32 वर्षीय महिला दि.13 मे रोजी संध्याकाळी घरापासून जवळपास असलेल्या ठिकाणी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शौचास गेली असता आरोपी संतराम नवनाथ जवरे वय 35 वर्षे (रा.जव्हारवाडी) हा पाठीमागून येऊन सदरील महिलेस मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देऊन गावापासून दोन कि.मी.अंतरावर घेऊन जात रात्री तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान दुसर्या दिवशी दि.14 मे रोजी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास तिला गावात आणून सोडले. दरम्यान पोलिसांना तक्रार दिल्यास तुझ्या पतीला जीवे मारून टाकील अशी धमकी दिली. या प्रकरणी दि.27 गुरुवारी महिलेच्या तक्रारीवरून गेवराई पोलीस ठाण्यात आरोपी संतराम नवनाथ जवरे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला शुक्रवारी दुपारी गावातून ताब्यात घेण्यात आले असून या घटनेचा तपास फौजदार संदिप काळे करत आहेत.