राशी भविष्य

या महिन्याच्या अखेरीस वर्षाचं पहिलं चंद्रग्रहण, जाणून घ्या महत्त्वाची माहिती

मुंबई : वर्ष 2021 चं पहिले चंद्रग्रहण मे महिन्यात होणार आहे. या महिन्याच्या अखेरीस बुधवारी 26 मे 2021 रोजी दुपारी 2 वाजून 17 मिनिटांनी हे ग्रहण लागेल आणि संध्याकाळी 7 वाजून 19 मिनिटांनी होईल. कोणत्याही ग्रहणाचा सर्व 12 राशींवर परिणाम होत असल्याने ज्योतिषात ही खगोलीय घटना खूप महत्वाची मानली जाते. 26 मेनंतर वर्षाचे दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण 19 नोव्हेंबरला लागेल. चंद्रग्रहणाशी संबंधित महत्वाची माहिती जाणून घेऊया.
वैशाख महिन्यातील हे चंद्रग्रहण दुपारच्या वेळी लागणार आहे, म्हणून भारतात हे उपछाया चंद्रग्रहण म्हणूनही पाहिले जाऊ शकते. त्यामुळे चंद्रग्रहणाच्या 9 तासपूर्वी लागणारं सुतककाळ भारतात मान्य असणार नाही. पण, हे ग्रहण अमेरिका, उत्तर युरोप, पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया आणि पॅसिफिक महासागर आणि हिंद महासागरातील काही भागात पूर्णपणे दिसून येईल.

चंद्रग्रहण काय असते?
जेव्हा सूर्याभोवती परिक्रमा करणारी पृथ्वी जेव्हा उपग्रह चंद्र आणि सूर्याच्या मधोमध एका सरळ रेषेत येते तेव्हा चंद्रावर सूर्याचा प्रकाश नाही तर पृथ्वीची छाया पडते. यामुळे चंद्र दिसत नाही. या खगोलशास्त्रीय घटनेला चंद्रग्रहण म्हणतात.

उपछाया आणि पूर्ण चंद्रग्रहणात फरक काय?
ग्रहण लागण्यापूर्वी चंद्र पृथ्वीच्या उपछायेत प्रवेश करतो. जेव्हा पृथ्वीची प्रत्यक्ष सावलीत प्रवेश न करता बाहेर पडते तेव्हा त्याला उपछाया चंद्रग्रहण म्हणतात. हेच कारण आहे की ग्रहण काळात चंद्र लुप्त होत नाही, तो थोडा अस्पष्ट दिसतो. तर जेव्हा चंद्र पृथ्वीच्या वास्तविक सावलीत प्रवेश करतो, तेव्हा पृथ्वीच्या सावलीमुळे तो अदृश्य होतो. याला पूर्ण चंद्रग्रहण म्हणतात.

ग्रहणाविषयी धार्मिक मान्यता
समुद्र मंथन झाल्यावर स्वार्भानु नावाच्या राक्षसाने कपट करत अमृत पिण्याचा प्रयत्न केला. असे करत असताना सूर्य आणि चंद्राने त्याला पाहिले आणि भगवान विष्णूला याबद्दल सांगितले. मग, भगवान विष्णूने त्या राक्षसाचे शिर धडापासून वेगळे केले. तोपर्यंत त्या राक्षसाने अमृताचे काही थेंब गिळंले, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला नाही आणि ते दोन राक्षस झाले आणि दोघेही अमर झाले. त्याच्या शिराचा भाग राहू आणि धड म्हणजे केतू असे म्हणतात.
मान्यता आहे की, याचा बदला घेण्यासाठी राहू आणि केतू वेळोवेळी चंद्र आणि सूर्यावर हल्ला करतात. जेव्हा ते सूर्य आणि चंद्रावर हल्ला करतात तेव्हा सूर्य आणि चंद्र कमजोर होतात आणि ग्रहण लागतं. यामुळे वातावरणात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. हेच कारण आहे की ग्रहणकाळात कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!