बीड, दि. 19 (लोकाशा न्यूज) : अचाणक खताच्या किंमती वाढल्यामुळे बीड जिल्ह्यासह संपूर्ण देशातील शेतकरी प्रचंड प्रमाणात अडचणीत सापडला होता. बुधवारी यासंदर्भात खा. प्रीतमताई मुंडे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय रासायन व खते मंत्र्यांना पत्र पाठविले होते, खतांची दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी त्यांनी या पत्राव्दारे केली होती, त्यांच्या या मागणीची मोदींनी दखल घेवून डीएपी खतांचे दर कमी केले आहेत. त्यानुसार डीएपी खताची एक बॅग 2400 ऐवजी 1200 रूपयांचा मिळणार असल्याचे नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. खा. प्रीतमताईंच्या एका मागणीने कोट्यावधी शेतकर्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून केंद्र सरकारबरोबरच त्यांचे आभार मानले जात आहेत.
रासायनिक आणि मिश्र खतांच्या अत्याधिक दरवाढीतून शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने शेतकरी हिताला प्राधान्य देत खतांच्या वाढलेल्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील काही दिवसांपासून खरीप हंगामाच्या तोंडावर खतांच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली होती, ही दरवाढ कमी करून शेतकर्यांना दिलासा दिल्याबद्दल खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,केंद्रीय रसायन आणि खते मंत्री सदानंद गौडा, कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर,राज्यमंत्री मनसुख मंडावीया यांचे आभार मानले आहेत.पेरणीपूर्वी रासायनिक आणि मिश्र खतांच्या दरांमध्ये वाढ झाल्यामुळे शेतकर्यांसमोर आर्थिक अडचणी उद्भवण्याची चिन्हे होती.यासंदर्भात खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून दरवाढ कमी करण्याची मागणी केली होती. शेतकर्यांच्या प्रगतीसाठी सदैव कटिबद्ध केंद्र सरकारने शेतकर्यांचा सन्मान करत त्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे.या निर्णयाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे खूप खूप आभार असे म्हणत त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले.तर केंद्र सरकारने घेतलेल्या दिलासादायक निर्णयाबद्दल शेतकर्यांमधून समाधान व्यक्त केले जाते आहे.या निर्णयासाठी पाठपुरावा केल्याबद्दल जिल्ह्यातील शेतकरी बांधव खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांचे आभार मानत आहेत.
शेतकरी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल
खा. प्रीतमताईंनी पंतप्रधानांचे मानले आभार
रासायनिक आणि मिश्र खतांच्या अत्याधिक दरवाढीतून शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने शेतकरी हिताला प्राधान्य देत खतांच्या वाढलेल्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील काही दिवसांपासून खरीप हंगामाच्या तोंडावर खतांच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली होती,ही दरवाढ कमी करून शेतकर्यांना दिलासा दिल्याबद्दल खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,केंद्रीय रसायन आणि खते मंत्री सदानंद गौडा,कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर,राज्यमंत्री मनसुख मंडावीया यांचे आभार मानले आहेत.