बीड

जिल्ह्यासाठी कलेक्टरांचा नवा आदेश, वाचा काय सुरू, काय राहणार बंद


बीड, दि.13 (लोकाशा न्यूज) : कोविड १ ९ विषाणूचा संसर्ग रोखण्याकरीता दिनांक १५.०५.२०२१ रोजीचे रात्रीचे १२.०० वाजेपासून ते २५,०५,२०२१ रोजीचे रात्रीचे १२.०० वाजेपर्यंत काय सुरू काय बंद ठेवायचे याबाबत जिल्हाधिकारी जगताप यांनी नवा आदेश जारी केला आहे. त्यानुसार दिनांक १५.०५.२०२१ रोजीचे रात्रीचे १२.०० वाजेपासून ते २५.०५.२०२१ रोजीचे रात्रीचे १२.०० चे या दरम्यान केवळ सर्व औषधालये ( Medical ) , दवाखाने , निदान क्लिनीक , लसीकरण केंद्रे , वैद्यकिय विमा कार्यालये , फार्मास्युटिकल्स , फार्मास्युटिकल कंपन्या , इतर वैद्यकिय आणि आरोग्य सेवा ज्यात सहाय्यक उत्पादन आणि वितरण युनिट तसेच त्यांचे डिलर्स , वाहतुक आणि पुरवता साखळी , लसींचे उत्पादन व वितरण , सैनिटायझर्स , मास्क , वैद्यकिय उपकरणे , कच्चा माल पुनिट पि व पेट्रोलियमशी संबंधित उत्पादने , टपाल सेवा याच आस्थापना पूर्णवेळ सुरु राहतील. दुध विक्री केवळ प्रत्येक दिवशी सकाळी ०७.०० ते १०.०० वाजेपर्यंत सुरु राहील, गैस वितरण दिवसभर सुरु राहील, बैंक / ग्राहक सेवा केंद्र यांचे कामकाज प्रत्येक दिवशी सकाळी १०.०० ते दु .०१.०० वाजेपर्यंत केवळ शासकीय व्यवहार , पेट्रोलपंप व गैस एजन्सी धारकांचे व्यवहार , कृषी निविष्ठांशी संबंधित व्यवहार , वेद्यकिय कारणास्तव केले जाणारे व्यवहार , सर्व शासकीय योजनेचे लाभार्थी यांचे वेतनाबाबतचे व्यवहार , अत्यावश्यक सेवेशी संबंधित असणा – या आस्थापना यांना या वेळेत बँकेत जाऊन व्यवहार करण्यास मुभा असेल . दरम्यानच्या काळात एटीएम केशच्या वाहनांना परवानगी असेल . तसेच दुपारी ०१.०० ते ०४.४५ वाजेपर्यंत बँकेचे कर्मचारी यांना केवळ अंतर्गत कामकाजास मुभा असेल , शासकीय कार्यालये नियमित वेळेप्रमाणे सुरु राहतील . ( ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक असेल . ), लसीकरणा करीता ४५ वर्षावरील ज्या व्यक्तीचा दुसरा डोस साठी मेसेज आला आहे. आरोग्य विभागाचे पत्र आले आहे. त्यांनाच लसीकरणचा डोस घेण्यासाठी जाण्यास मुभा असेल , ( लसीकरणासाठी आलेला मेसेज / आरोग्य विभागाचे पत्र , आधार कार्ड सोबत असणे आवश्यक असेल ), कृषी व्यवसायाशी संबंधित थि – थियाणे , खते , औषधे यांची जी दुकाने आहेत त्या दुकान मालकास आलेले बि – बियाणे , खते , औषधे केवळ गोडाऊनला किया दुकानामध्ये उतरुण घेण्यास मुभा असेल , नरेगाची कामे सुरु राहतील , त्या ठिकाणी सामाजिक अंतर , मारक , सॅनिटायझर चा व कोविड -१ ९ विषयक जे नियम आहेत ते पाळणे बंधनकारक असेल . जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार यांनी दिनांक १६.०५.२०२१ २०.०५.२०२१ या कालावधीत केवळ गोडाऊन से स्वस्त धान्य दुकान किंवा गोलाकान या ठिकाणी माल उतरुण घेणे व दिनांक २१,०५,२०२१ पासून सकाळी ०७.०० ते ११.०० या वेळेतच लाभाभ्यांना धान्य वितरण करण्यास मुभा राहील . ( राशनसाठी जाणा – या व्यक्तींच्या सोबत राशनकार्ड , आधार कार्ड असणे आवश्यक आहे . ), जिल्ह्यातील प्रकारच्या मद्यविकी अनुशपया पूर्णवेळ पूर्णपणे बंद राहतील . दिनांक १५/०५/२०२१ रोजीचे रात्रीचे १२.०० वाजेपासून ते २५/०५/२०२१ रोजीचे रात्रीचे १२.०० वाजेपर्यंत या कालावधीत निर्बंंध असलेल्या आस्थापना चालू असल्याचे निदर्शनास आल्यास त्या सिल करण्यात घेऊन त्यांचा परवाना र करण्याची कारवाई करण्यात येईल . सदरच्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणा आणि सर्व संबंधित विभागाची राहील . उपरोक्त आदेशाचे पालन न करणान्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फोजदारी कारवाई करण्यात येईल. असे आदेश जगताप यांनी गुरुवारी दिले आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!