बीड :- मराठा समाजाच्या आरक्षण बद्दल सोशल मीडियावर अपशब्दात भाष्य करत मराठा समाजाच्या भावना दुखावण्याचे काम केल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी हिंगोली जिल्हा प्रभारी दादा मुंडे यांची काँग्रेस पक्षातून निलंबनाची कारवाई करत हकालपट्टी करण्यात आली.
काँग्रेस पक्षाची भूमिका विचारात न घेता, आपण आपली वैयक्तिक मते जनतेसमोर मांडत आहात. यामुळे पक्षाच्या भूमिकेविषयी सर्वसामान्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे आपल्याविरोधात स्थनिक पातळीवरुन अनेक तक्रारी प्रदेश कार्यालयास प्राप्त झालेल्या आहेत. असा ठपका ठेवण्यात आला आहे.
