बीड, दि. 11 (लोकाशा न्यूज) : भरधाव पिकअपने दिलेल्या धडकेत महामार्ग पोलीस कर्मचारी हे गंभीररित्या जखमी झाले. ही घटना मंगळवारी (दि.11) चौसाळा परिसरात राष्ट्रीय महामार्गावर घडली. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
सुदाम वनवे असे पोलीस कर्मचार्याचे नाव आहे. मंगळवारी ते कर्तव्यावर होते. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चौसाळा परिसरात वाहनांवर कारवाई करत होते. यावेळी एका भरधाव आलेल्या पिकअपने त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये वनवे हे गंभीररित्या जखमी झाले. सोबत असलेल्या कर्मचार्यांनी त्यांना तातडीने बीडमधील फिनीक्स रूग्णालयात दाखल केले होते, त्यानंतर त्यांना पुढील उपचाराकरिता औरंगाबाद येथील खासगी रूग्णालयात नेण्यात आले होते. यावेळीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने संपूर्ण पोलिस दलातून हळहळ व्यक्त केली जात आहे.