बीड, दि. 11 : कोरोनाच्या प्रतिबंधासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार बीड जिल्ह्यात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. सध्या 18 ते 44 वर्ष वयाच्या नागरीकांसाठी कोविड लसीकरण सत्र तालुक्याच्या ठिकाणी सुरु असुन या वयोगटाकरीता दररोज 200 डोसेस याप्रमाणात लसीकरण करण्यात येत आहे. याअनुषंगानेच धारूर, माजलगाव, परळी वडवणी, शिरुर,बीड, येथे 18 ते 44 वर्ष वयाच्या नागरीकांसाठी कोव्हॅक्सीन लसीचे सत्र सुरू करण्यात आले होते. बुधवारपासून (दि.12) राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार अंबाजोगाई, धारूर, माजलगाव, पाटोदा, वडवणी, शिरुर, बीड या ठिकाणी सुरु असलेले 18 ते 44 वर्ष वयाच्या नागरीकांसाठी कोव्हॅक्सीन लसीचे सत्र रद्द करण्यात आले. ही शिल्लक असलेली कोव्हॅक्सीन लस 45 वर्षापेक्षा जास्त वयाच्या नागरीकांच्या दुसर्या डोससाठी वापरण्यात येणार आहे. तसेच कोव्हीशिल्ड लस असलेले बीड, केज, परळी, अंबाजोगाई, आष्टी, गेवराई येथील लसीकरण सत्राकरीता दररोज दुपारी 2 वाजता लस उपलब्ध असेपर्यंत स्लॉट ओपन केला जाईल तरी 18 ते 44 वर्ष वयाच्या नागरीकांनी नोंदणी करून अपॉइंटमेट नुसार लसीकरण करावे असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले असुन कोविड संसर्गाच्या पार्श्वभुमीवर नागरीकांनी अनावश्यक गर्दी टाळावी कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करावे असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे.