बीड, दि.10 : दोन तासाऐवजी आता बैंकाना चार तास काम करण्याची मुभा देण्यात आली आहे, तसे आदेश जिल्हाधिकारी रविन्द्र जगताप यांनी काडले आहेत.
०८.०५.२०२१ रोजीचे आदेश उपरोक्त विषयों फौजदारी प्रक्रीया संहीता १९ ७३ चे कलम १४४ अन्वये काविड -१ ९ विषाणूचा संसर्ग रोखण्याकरीता या कार्यालयाचे संदर्भ क्र .०२ चे आदेशान्वये बँकेच्या वेळ व कामकाजाबाबत आदेशित करण्यात आले आहे . त्याअनुषंगाने कळविण्यात येते की , सदरील वेळ व कामकाजाबाबत बदल करण्यात येऊन जिल्ह्यातील सर्व बँकचे कामकाज सकाळी १०.०० ते दुपारी ०२.०० वाजेपर्यंत ( दिनांक १०.०५.२०२१ ते १५.०५.२०२१ पर्यत शासकीय सुटीचे दिवस वगळून ) केवळ अंतर्गत कामकाज , शासकीय व्यवहार , पट्रोलपंप व गॅस एजन्सी थारकांचे व्यवहार , कृषी विषयक संबंधित व्यवहार , वैद्यकिय कारणास्तव केले जाणारे व्यवहार , सर्व शासकीय योजनेचे लाभार्थी यांच बेतनाबाबतचे व्यवहार , अत्यावश्यक सेवेशी संबंधित असणा – या आस्थापना यांना या वेळेत बँकेत जाऊन व्यवहार करण्यास मुभा देण्यात यावी . या बाबत आपल्या स्तरावरुन सर्व बँकांना अवगत करावे, असे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी आपल्या आदेशात मटले आहे.