महाराष्ट्र

अनवाणी पायाने पतीला वाचवण्यासाठी लता करे मॅरेथाॅन धावल्या पण, कोरोनाने घात केला

ज्याचा जीव वाचविण्यासाठी जिवाचे रान केले, अनवाणी पायाने नऊवारी लुगडे नेसून मॅरेथॉनमध्ये सहभागी होत पारितोषिक पटकावले, त्या जिवानेच अखेरचा श्वास घेतला अन् एका जिद्दी माऊलीची धावच थंडावली. अनवाणी पायाने पतीवरील उपचारासाठी मॅरेथॉनमध्ये धावून पैसे गोळा करणा-या आणि त्यांच्यावरील चित्रपटात स्वत: भूमिका साकारणाऱ्या लता करे (lata kare) यांचे पती भगवान करे (bhagwan kare) यांचे मंगळवारी (ता. 4) कोरोनाने (Corona) निधन झाले.
आपल्या अचाट जिद्दीच्या जोरावर कसलाही पाठिंबा नसताना वयाच्या 67 व्या वर्षी लता करे यांनी केवळ उपचारासाठी बक्षीसाची रक्कम कामाला येईल या उद्देशाने बारामतीत झालेल्या मॅरेथॉनमध्ये भाग काय घेतला. त्यांना प्रथम क्रमांक काय मिळाला आणि त्या एका रात्रीत प्रसिध्दी काय पावल्या. सगळेच एखाद्या चित्रपटात शोभावे असेच झाले. कडाक्याच्या थंडीत धावल्या आणि पुढे सलग तीन वर्षे या स्पर्धेत भाग घेत त्यांनी ज्येष्ठांच्या श्रेणीत विजेतेपदाची हॅटट्रीक साधली. हा प्रवास इथवरच थांबला नाही तर या जिद्दी माऊलीवर ए चित्रपट करायचे दक्षिणात्य निर्माते ए कृष्णा अरुबोधु यांनी निश्चित करुन चित्रपटाची निर्मिती केली, नविन देशबोईना यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले. यातही विशेष म्हणजे लता करे यांची भूमिका स्वताः लता करे यांनीच साकारलेल्या या मराठी चित्रपटास राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये विशेष पुरस्कार मिळाला.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!