बीड

जिल्ह्यातील ‘त्या’ शिक्षकांना मिळणार पदस्थापना ! पदस्थापनेसाठी त्रिसदस्यीय समितीची स्थापना, शिक्षकांनी यंत्रणेवर दबाव आणल्यास सीईओ करणार शिस्तभंगाची कारवाई, त्याबरोबरच पदस्थापनेसाठी सर्वात शेवटी लागणार नंबर


बीड, दि. 28 (लोकाशा न्यूज) : सीईओ अजित कुंभार आणि त्यांच्या यंत्रणेने जिल्ह्यातील शिक्षकांच्या पदस्थापनेची प्रक्रिया हाती घेतली आहे. याअनुषंगानेच त्यांनी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. विशेष म्हणजे या पदस्थापनेसाठी कोणत्याही शिक्षकांनी यंत्रणेवर दबाव आणल्यास त्यांच्यावर सीईओ शिस्तभंगाची कारवाई करणार आहेत. ते एवढ्यावरच स्थापना नसून यंत्रणेवर दबाव आणणार्‍या शिक्षकांचा पदस्थापनेसाठी सर्वात शेवटी नंबर लागणार आहे, असे सीईओंनी 28 एप्रिल रोजी काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
शासनाच्या धोरणानुसार शिक्षक संवर्गाच्या आंतर जिल्हा बदल्या सन 2017 पासून ऑनलाईन पोर्टलन्दारे होतात. सन 2017 टप्या क्रमांक 01 ते सन 2020 टप्पा क्रमांक 4 असे चार टप्यात आंतर जिल्हा बदल्या झाल्या आहेत. संदर्भ क्रमांक 02 च्या शासन पत्रानुसार टप्पा क्रमांक 1 ते टप्पा क्रमांक 4 मध्ये ऑनलाईन आंतर जिल्हा बदलीने बीड जिल्हा परिषदेमध्ये बदली झालेल्या शिक्षकांना बीड जिल्हा परिषदेमध्ये सामावून घेवून पदस्थापना द्यायची आहे. सदर आंतर जिल्हा बदलीने रुजू झालेल्या शिक्षकांना त्यांच्या मूळ सेवा जेष्ठतेनुसार समुपदेशनाने रिक्त पदावर विद्यार्थ्याची शैक्षणिक निकड लक्षात घेवून पदस्थापना देण्यात येणार आहेत. सदर पदस्थापना देताना सर्व प्रशासकीय प्रक्रियेमध्ये पादर्शकता राहण्याकरिता जिल्हा परिषद, बीड स्तरावर रुजु झालेल्या शिक्षकांच्या अभिलेखे तपासणी करुन सेवा जेष्ठता ठरवून पदस्थापनेची प्रक्रिया पूर्ण करणे करिता त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आलेली असल्याने कोणत्याही शिक्षकांनी स्थापनेसाठी गैर मार्गाचा वापर कर नये, पदस्थापनेसाठी कोणत्याही प्रकार दबाब तंत्राचा वापर केल्यास संबधित शिक्षकांवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल व अशा शिक्षकांना सेवाजेष्ठतेचा निकष न लावता समूपदेशनाच्या सर्वात शेवटी प्रशासकीय सोईनुसार पदस्थापना देण्यात येईल, करिता संबंधित शिक्षकांनी स्वतः व इतरांमार्फत प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न करु नये व कोणाच्याही अमिषाला बळी पडू नये पदस्थापने बाबत काहीही अडचण असल्यास शिक्षणाधिकारी (प्रा.) जि.प.बीड यांना रितसर लेखी निवेदन शिक्षण विभागाचा ईमेल आयडी ावालशशवळरसारळश्र.लेा यावर सादर करावे, असे आवाहन सीईओ अजित कुंभार यांनी केले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!