बीड

जिल्ह्यात ई-पास सुविधा सुरू; असा मिळेल पास

बीड, दि.26 (लोकाशा न्यूज) : बीड जिल्ह्यात ई पास सुविधा सुरू करण्यात आली. लॉकडाऊनच्या काळात अति महत्वाच्या कामासाठी किंवा वैद्यकीय उपचारासाठी बीड जिल्ह्यात अथवा जिल्ह्याबाहेर जाण्यासाठीच्या प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता असल्यास https://covid19.mhpolice.in या लिंकचा वापर करावा असे आवाहन जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.

याबाबत नागरिकांना माहिती देण्यासाठी पोलीस दलाने म्हटले आहे की, वरील पोर्टलमध्ये दिलेल्या सर्व पर्यायामधील माहिती अचूक भरावी. आवश्यकते सर्व कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करुन आपला ऑनलाईन ई-पाससाठी अर्ज भरावा. अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचारी यांना पासची आवश्यकता नाही. त्यांनी आपले अधिकृत ओळखपत्र सोबत बाळगावे. अधिक माहितीसाठी सायबर पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक आर.एस.गायकवाड मो.८८८८८०४६२० यांच्याशी सकाळी ८ ते दुपारी ४ यावेळेत संपर्क साधावा. तसेच दुपारी ४ ते रात्री १२ यावेळेत उपनिरीक्षक व्हि.टी.नाचण मो.क्र. ९१११००२१०० यांच्याशी संपर्क साधावा.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!