बीड

250 खाटांवर ऑक्सिजनची सुुविधा सुरू करा ; आ.संदिप क्षीरसागरांनी जिल्हा रूग्णालयात जावून कोव्हिड परिस्थितीचा घेतला आढावा, मुलींच्या वसतीगृहाचे कोव्हिड सेंटरमध्ये रूपांतर


बीड (प्रतिनिधी):- बीड जिल्हा रूग्णालयामध्ये आ.संदिप क्षीरसागरांनी जावून कोव्हिड परिस्थितीचा आढावा घेतला. कोव्हिड रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रूग्णालय परिसरातील मुलींच्या वसतीगृहाचे रूपांतर कोव्हिड सेंटरमध्ये करण्यात आले. उपलब्ध करण्यात आलेल्या 250 खाटांवर ऑक्सिजन सुविधा तात्काळ सुरू करण्याच्या सूचना आ.संदिप क्षीरसागर यांनी जिल्हा रूग्णालय प्रशासनाला दिल्या आहेत.
बीडमध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढू लागली आहे. जिल्हा रूग्णालयात दाखल होत असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांसंदर्भातील प्राप्त होत असलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी बीडच्या जिल्हा रूग्णालय येथे जावून कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुर्यकांत गिते, डॉ.राठोड, डॉ.आंधळकर, लोकपत्रकार भागवत तावरे, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब डावकर, जीवन जोगदंड, अजय सुरवसे यांच्यासह आदी जण होते. रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रूग्णालय परिसरातील मुलींच्या वसतीगृहाचे रूपांतर कोव्हिड सेंटरमध्ये करण्यात आले असून यामध्ये 250 खाटांवर ऑक्सिजन सुविधा सुरू करण्याच्या सूचना यावेळी आ.संदिप क्षीरसागरांनी दिल्या. रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नव्याने उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटची पाहणी त्यांनी यावेळी केली. जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत. नागरिकांनीही सोशल डिस्टंस, घराबाहेर पडतांना मास्क, सॅनिटायझर वापर करावा आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहनही यावेळी आ.संदिप क्षीरसागर यांनी केले आहे.


कोव्हिडमध्ये काम करणार्‍या आरोग्य
कर्मचार्‍यांच्या पाठिशी -आ.संदिप क्षीरसागर

कोव्हिडच्या या वाढत्या लाटेसोबत लढण्यासाठी आरोग्य विभागातील सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या पाठिशी असल्याची ग्वाही देखिल यावेळी आ.संदिप क्षीरसागर यांनी दिली. या कोरोनाच्या लढ्या आरोग्य विभागात काम करणार्‍या कर्मचार्‍यांचे कौतुक करत त्यांना साथ देणार्‍या जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन यांचंही त्यांनी कौतुक केलं.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!