बीड

धुलीवंदनाच्या दिवशी जिल्हाधिकारी यांनी घेतला सिव्हीलच्या कोरोना वार्डाचा राऊंड, संपूर्ण परिस्थितीचा घेतला आढावा ; रुग्णाकडून आरोग्य यंत्रणेचे कौतुक

बीड, दि.29 :- राज्यासह जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून कोरोना बाधित रुग्ण संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे जिल्हाधिकारी जगताप यांनी जिल्हा रुग्णालयातील कोव्हिडं रुग्णालयाला भेट देत. सोमवार दि. 29 मार्च रोजी कोरोना वॉर्ड मधील राऊंड घेतला. यावेळी संपुर्ण परिस्थितीचा आढावा घेत विचारपूस केली. यावेळी रुग्णांनी आरोग्य यंत्रनेकडून उत्तम आरोग्य सेवा दिली जात असल्याचे सांगत दिल्या जाणाऱ्या सेवेबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी जगताप यांनी जिल्ह्यामध्ये 10 दिवसाचा लॉकडाऊन लावण्यात आले आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णामध्ये वाढ होत असल्याने जिल्हाधिकारी जगताप यांनी जिल्हा रुग्णालयातील कोव्हिडं सेंटरला भेट देत राऊंड घेतला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, तहसीलदार वमने, डॉ. हुबेकर, डॉ.सचिन आंधळकर, डॉ. ढाकणे, आदिनाथ मुंडे, मुकादम प्रकाश गायकवाड, मुकादम बिभीषण घावाणे यांच्यासह आदी कर्मचारी उपस्थित होते.

ऑक्सिजन प्लान्टला सुरुवात
वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजनची कमतरता भासत असल्याने जिल्हा रुग्णालय बीड यांनी स्वत:च ऑक्सिजन तयार करण्याचे प्लांट उभा केलं होते परंतु त्याचे केमिकल आले नसल्याने तो सुरू झाला नव्हता. सोमवारी दि.29 मार्च रोजी केमिकल आल्यानंतर जिल्हाधिकारी जगताप यांनी त्या प्लान्टचे उदघाटन करत सुरू केले. जिल्हा रुग्णालयाने स्वतःचे ऑक्सिजन प्लांट तयार केल्याने ऑक्सिजन वरील खर्च कमी होणार आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!