बीड

बीड शहरासह ग्रामीण भागातील रेस्टॉरंट, खानावळ चालू करण्याची परवानगी द्यावी – सुभाष राऊत


बीड / प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील हॉटेल व्यवसाय, रेस्टॉरंट व छोटे-मोठे व्यवसाय अनिश्चित काळासाठी बंद ठेवावे त असा आदेश जिल्हाधिकारी बीड यांनी दि.१३ मार्च २०२१ रोजी काढला असून यामुळे अनेक व्यवसाय बंद झाले असल्याने व्यावसायिकांसह कामगार अडचणीत आले आहेत. तरी बीड शहरासह ग्रामीण भागातील रेस्टॉरन्ट, खानावळ व छोटे-मोठे व्यवसाय covid-19 चे अटी व शर्ती लागू करून चालू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष अॅड. सुभाष राऊत यांनी केली आहे.
याबाबत जिल्हाधिकारी बीड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोव्हिड मुळे गेल्या वर्षभर रेस्टॉरंट, खानावळ आणि छोटे-मोठे व्यावसायिकांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. काही हॉटेलमध्ये ७० ते ८० कामगार काम करत असताना हॉटेल व्यवसाय बंद केल्यास त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होतो व त्यांच्या कुटुंबीयांची उपासमार होते. त्याचबरोबर हॉटेल व्यावसायिकांना बँकेचे हप्ते, कामगारांचा पगार महिन्याला देणे बंधनकारक असते. व्यवसाय बंद केले तर कामगारांचा पगार आणि बँकेचे हप्ते कसे भरायचे असा मोठा प्रश्न निर्माण होतो. तरी बीड शहरासह ग्रामीण भागातील रेस्टॉरंट, खाणावळ व छोटे-मोठे व्यावसायिकांना अटी व शर्ती लागू करून व्यवसाय चालू ठेवण्यास परवानगी दिल्यास सदरील व्यवसायिक आपल्या अटी व शर्ती यांचे पालन करत सोशल डिस्टंसिंगचे पालन करून व्यवसाय करतील.
सदरील व्यवसाय चालू करण्याची परवानगी न दिल्यास सर्व व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येऊन बँकेतील कर्जावर दुप्पट ते तिप्पट व्याज आकारले जाईल मग ते बंद दिवसांमध्ये कसे भरणार? तरी सदरील व्यावसायिकांना थोड्या प्रमाणात का होईना सूट देणे अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून सदरील व्यवसायिकांची आणि गोरगरीब कामगारांची उपजीविका भागू शकेल. तरी जिल्हाधिकारी बीड यांनी शहरासह ग्रामीण भागातील रेस्टॉरंट, खानावळ व छोटे-मोठे व्यवसाय अटी व शर्तींचे पालन करून सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी अॅड. सुभाष राऊत यांनी केली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!