परळी ः बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या कृपेने सामाजीक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपातून ते मुक्त होतील. हे त्यांच्यावर जाणून बुजून केले गेलेले आरोप आहेत, असे म्हणत त्यांचे समर्थक नगरसेवक गोपाळ आंधळे यांनी प्रभु वैद्यनाथ मंदीर ते सावतामाळी मंदिरापर्यंत दडवंत घातले.
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर तथ्यहिन व चारित्र्यहनन करणारे आरोप करण्यात आले होते. मंत्री मुंडे हे वैद्यनाथाचे निस्सीम भक्त असल्याने प्रभु वैद्यनाथाने हे बालंट दुर करावे यासाठी दंडवत घालण्याचा नवस नगरसेवक गोपाळ आंधळे यांनी केला होता.
मुंडे यांच्यावरील आरोप काही दिवसातच दुर होत गेले असुन आरोप करणाऱ्या महिलेचा खरा चेहरा समाजासमोर आल्याचे सांगत धळे यांनी सोमवारी दुपारी साेडबारा वाजता सावतामाळी मंदिर येथुन आपल्या पत्नी शुभांगी आंधळे यांच्यासह दंडवत घाल्याण्यास सुरुवात केली.
गटनेते वाल्मीक कराड यांच्या मार्गदर्शनाखाली संत सावतामाळी मंदिर येथुन सुरु झालेला हा दंडवत राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक, नेहरू चौक, संत जगमित्रनागा महाराज मंदिर येथुन प्रभू वैद्यनाथ मंदिर पर्यंत घातला. या प्रकरणातून धनंजय मुंडे यांना दोषमुक्त करत षडयंत्र करणाऱ्याचा चेहरा समाजासमोर यावा, अशी प्रार्थना देखील त्यांनी वैद्यनाथाच्या चरणी केली.
यावेळी राष्ट्रवादीचे चंदुलाल बियाणी, दिपक देशमुख , आयुबभाई पठाण, पिंटु मुंडे, शिवसेनेचे अभयकुमार ठक्कर, नगरसेवक विजय भोयटे,चेतन सौंद॓ळे, रमेश भोयटे,सुरेश नानवटे, हनुमान आगरकर, बळीराम नागरगोजे आदींची उपस्थिती होती.