ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली. तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींपैकी १९ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका झाल्या होत्या. चार ग्रा.पं. बिनविरोध निवडण्यात आल्या. सात ग्रामपंचायतींचा निकाल हाती लागला असून यामध्ये सहा ग्रा.पं.वर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला तर एक ग्रामपंचायत दुपारपर्यंत भाजपाच्या ताब्यात आली होती.
येवता, मुंडेवाडी, वाघेबाभुळगाव, काशीदवाडी, पाथरा, कोरडेवाडी या ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा झेंडा फडकला तर बोबडेवाडी ही ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात आली. एकूण २३ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका घोषीत झाल्या होत्या. ४ ग्रामपंचायत बिनविरोध काढण्यात आल्या होत्या तर १९ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात निवडणुका लढवण्यात आल्या होत्या.