महाराष्ट्र

500 रुपयांत ’कोविशिल्ड’ लसीचा डोस, सीरम इन्स्टिट्युटचे अदर पुनावाला यांची माहिती


पुणे, दि. 20 (लोकाशा न्यूज) : कोरोना लसीची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. लवकरच कोरोना व्हायरसवरील लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मात्र या क्षणी प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न सतत निर्माण होत आहे की कोरोना लसीसाठी आपल्याला किती पैसे द्यावे लागतील? ही लस सर्वसामान्यांसाठी नेमकी कधी उपलब्ध असेल? ऑक्सफोर्डच्या कोरोना लसीची अ‍ॅस्ट्रेजेनिकासोबत चाचणी करणारे पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी सांगितलं की, भारतात कोरोनाच्या लसची किंमत 500 ते 600 रुपयांच्या दरम्यान असेल. एका मुलाखती पूनावाला यांनी सांगितलं की, 2021 च्या पहिल्या तिमाहीत ऑक्सफोर्डच्या कोविड 19 लसचे सुमारे 30 ते 40 कोटी डोस उपलब्ध होती. या लसीसाठी सामान्य लोकांना 500 ते 600 रुपये द्यावे लागतील, भारत सरकारला ही लस स्वस्त दरात दिली जाईल. भारत आमची प्राथमिकता असल्याचं सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पुनावाला यांनी म्हटलं आहे. अमेरिकन औषध निर्माता कंपनी मोडेर्नाने सोमवारी जाहीर केले की कोविड 19 साठीची आमची लस 94.5 टक्के प्रभावी आहे. यापूर्वी, अमेरिका आणि जर्मनी यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या फायझर आणि बायोटिक यांनी देखील अशीच घोषणा केली होती. या दोन्ही लसींचा तिसरा टप्प्यातील चाचणी दरम्यान चांगला निकाल लागला आहे आणि नियामकाच्या मान्यतेनंतर, लोकांना लस डोस देण्याचे काम डिसेंबरमध्ये सुरू केले जाऊ शकते.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!