बीड

एसपींचा आदेश धडकताच अवैध धंद्यांवर पडल्या धाडी,192 गुन्हे दाखल करून 216 जणांवर केली कारवाई, पावणे बारा लाखाचा मुद्देमालही जप्त


बीड, दि. 28 : राजा रामास्वामी यांनी नुकताच पोलिस अधीक्षक पदाचा पदभार स्विकारला आहे, सध्या ते विभाग आणि पोलिस स्टेशनस्तरावर जावून आढावा घेत आहेत. विशेष म्हणजे आपआपल्या ठाण्याच्या हद्दीत एकही अवैध धंदा चालणार नाही, याची दखल प्रत्येक पोलिस कर्मचार्‍यांनी घ्यावी, अशा स्पष्ट सुचना राजारामा स्वामी यांनी ठाणेदारांना दिलेल्या आहेत. त्यांच्या आदेशानुसारच जिल्ह्यात अवैध धंद्यांवर धाडी टाकल्या जात आहेत. तीन दिवसाच्या मोहिमेत जिल्ह्यात ठिकठिकाणी अवैध धंद्यांवर धाडी टाकून 192 गुन्हे दाखल करण्यात आली आहेत. या गुन्ह्याच्या माध्यमातूनच 216 जणांवर थेट कारवाई करण्यात आली आहे.
पोलिस अधीक्षक राजारामा स्वामी यांच्या आदेशाप्रमाणे 25 सप्टेंबर 27 सप्टेंबर या कालावधीत पोलिस स्टेशन स्तरावर विशेष मोहिम राबवून अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी अवैध धंद्यांची माहिती काढून केसेस करण्याबाबत आदेशीत केले होते, त्याअनुषंगाने बीड जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशन प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षकांच्या अधिपत्याखाली वेगवेगळे पथके तयार केली, त्यानुसार अवैध धंद्यांची माहिती काढून नमूद कालावधीमध्ये अवैध दारू विक्री करणार्‍यांवर मोठी कारवाई केली, या तीन दिवसात अवैध दारू विक्री केल्याप्रकरणी 146 गुन्हे दाखल करून 157 जणांना ताब्यात घेण्यात आले, तसेच त्यांच्याकडून 8,06,394 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच अवैध जुगाराच्या 46 केसेस करून 109 जणांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून 3,52,455 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यापुढेही संपूर्ण जिल्हाभर विशेष मोहिम राबवून अवैध धंद्यांवर केसेस करण्याचे प्रस्तावित आहे. सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलिस स्टेशन प्रभारी अधिकारी व पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांच्या अधिपत्याखाली पोलिस अधीकारी व कर्मचार्‍यांनी केली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!