बीड, दि. 28 सप्टेंबर : स्थानिक गुन्हे शाखेचे यापुर्वी स्थापीत असलेले विशेष पथक बंद करण्यात आले आहे. एसपी राजा रामा स्वामी यांच्या आदेशानुसार अवैध धंद्यांवर हातोडा मारण्यासाठी तीन दिवस जिल्ह्यात मोहिम हाती घेण्यात आली होती, या मोहिमेच्या माध्यमातून अनेकांवर कारवाई करण्यात आली आहे.
अवैध धंदे रोखण्यासाठी तत्कालीन पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे एक विशेष पथक नेमले होते. या पथकाने बड्या माशांनाही गळाला लावून जिल्ह्यात मोठमोठ्या कारवाया केल्या होत्या. मात्र नविन पोलिस अधीक्षक आल्यानंतर पोलिस दलात अनेक बदल होत असतात, त्यानुसार एलसीबीचे यापुर्वी स्थापीत विशेष पथक बंद झालेले आहे, नवे एसपी नव्याने पथके निर्माण करू शकतात, तर दुसर्या बाजूने एसपी राजा रामा स्वामी यांनी अवैध धंद्यांवर हातोडा मारण्यास सुरूवात केली आहे. त्यांच्या आदेशानुसारच पोलिस ठाण्याच्या स्तरावरून जिल्हभरातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवयांसाठी तीन दिवसांसाठी एक मोहिम हाती घेण्यात आली होती, ती मोहिम बर्यापैकी यशस्वी झाल्याचे समोर येत आहे.