बीड

केज तालुक्यात रोहियोत 13 कोटींचा घोटाळा! चौकशीसाठी सीईओ अजित कुंभार यांनी नेमले वीस पथके


बीड, दि. 28 सप्टेंबर : तालुक्यात रोहयो’मध्ये 114 ग्रामपंचायत अंतर्गत 13 कोटींचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. याच्या चौकशीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी आता 20 पथकांची नियुक्ती केली असून ग्रामपंचायतींची झाडाझडती होणार आहे. गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे यांच्या कार्यकाळातील हा सर्वात मोठा तालुक्यातील घोटाळा मानला जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की गतवर्षी व चालू वर्षीच्या कामात मोठा गैरव्यवहार झाल्याचे दिसून येत आहे. सन 2019-2020 मध्ये 114 ग्रामपंचायतींमध्ये 10 कोटी रूपयांची कामे रोजगार हमी योजनेतून कामे करण्यात आली आहेत. त्यात 7 कोटी अकुशल तर 3 कोटी रूपये कुशल कामांवर खर्च केलेले आहेत. तर चालू वर्षात म्हणजे सन 2020-2021 मध्ये आतापर्यंत मंजूरी दिल्या नसल्या तरी जुन्या सुरु असलेल्या कामांवर 3 कोटी रूपये खर्च झाले आहेत. या बहुतांश कामे ही वृक्ष लागवड, संगोपनाची आहेत. हा प्रकार गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे यांच्या कार्यकाळात घडला आहे. दरम्यान, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी.बी.गिरी हे चौकशीसाठी गेले असता त्यांना रेकॉर्ड गायब केल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब लक्षात येतात मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या सुचनेनूसार रोहयो कामांच्या पडताळणीसाठी पथके आता चौकशीला सुरुवात करणार आहे. जिल्हास्तरीय एक व अन्य 19 अशी पथके असून यात इतर तालुक्यातील सदस्यांचा समावेश असणार आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!