महाराष्ट्र

निर्माता करण जोहरचीही एनसीबीकडून चौकशी? वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बैठकीनंतर निर्णय


मुंबई, दि. 28 सप्टेंबर : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासादरम्यान समोर आलेल्या ड्रग्ज कनेक्शन प्रकरणाची सध्या एनसीबीकडून चौकशी सुरु आहे. याप्रकरणी तपास करणार्‍या दिल्ली-मुंबई एनसीबी पथकांकडून रिपोर्ट घेण्यासाठी स्वतः डीजी एनसीबी राकेश अस्थाना दिल्लीहून मुंबईला पोहोचले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत रविवारी त्यांची एनसीबीच्या अधिकार्‍यांसोबत जवळपास 3 तास बैठक पार पडली. ज्यामध्ये आतापर्यंत एनसीबीकडून करण्यात आलेलं चौकशी सत्र, तपास, त्यातून मिळालेले पुरावे, अटक सत्र आणि बॉलिवूड सेलिब्रिटींची चौकशी यासंदर्भात चर्चा झाली.
2019 मध्ये निर्माता करण जोहरच्या घरी झालेल्या पार्टीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावेळीही बॉलिवूडमधील ड्रग्जचा मुद्दा ऐरणीवर आला होता. यासंदर्भातही एनसीबीच्या अधिकार्‍यांमध्ये झालेल्या बैठकीत चर्चा झाली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्हिडीओचा फॉरेंसिक रिपोर्टही एनसीबीला मिळाला आहे. ज्यावरून स्पष्ट होत आहे की, व्हिडीओमध्ये कोणत्याच प्रकारची छेडछाड करण्यात आलेली नाही. दरम्यान, या व्हिडीओबाबत स्पष्टीकरण देताना करण जोहरनेही सांगितलं होतं की, त्याच्या घरी पार्टी करण्यात आली होती. परंतु, त्यावेळी ड्रग्जचं सेवन करण्यात आलेलं नव्हतं. आज पुन्हा एकदा डीजी एनसीबी राकेश अस्थाना यांच्यासोबत डेप्युटी डायरेक्टर केपीएस मल्होत्रा, जोनल हेड समीर वानखेडे आणि डीडीज मूथा अशोक जैन या अधिकार्‍यांची आणखी एक बैठक होऊ शकते. ज्यामध्ये 2019मध्ये व्हायरल झालेल्या व्हिडीओ संदर्भात करण जोहरची चौकशी करायची की, नाही यासंदर्भात निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख अन्
करण जोहर एनसीबीच्या रडारवर?

बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी तपास करताना रविवारी करण जोहर गोव्याहून मुंबईत दाखल झाला. या प्रकरणी शनिवारी एनसीबीच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं होतं की, कोणत्याही बॉलिवूड सेलिब्रिटींना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं नाही.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!