बीड

झेडपीला कायमस्वरूपी शिक्षणाधिकारी मिळाले, श्रीकांत कुलकर्णींनी पदभार स्विकारला


बीड, दि. 23 : गेल्या एक वर्षांपासून रिक्त असलेला बीड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी (प्रा.) पदाचा पदभार बुधवारी दि.23 सप्टेंबर रोजी नव नियुक्त शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी घेतला.
यावेळी प्रभारी शिक्षणाधिकारी अजय बहिर, उपशिक्षणाधिकारी भगवान सोनवणे, हिरालाल कराड, पर्यायी समन्वयक, समग्र शिक्षा अभियान सहाय्यक कार्यक्रम अधिकारी तथा विस्तार अधिकारी तुकाराम पवार, गटशिक्षणाधिकारी गौतम चोपडे, कक्ष अधिकारी गिरीष बिजलवाड, परशुराम आर्सुळ, कार्यक्रम अधिकारी नारायण नागरे, आसाराम काशिद इ. नी त्यांचे स्वागत केले. श्रीकांत कुलकर्णी यांनी गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी व प्रशासकीय अधिकारी म्हणून 25 वर्ष अव्याहत पणे सेवा बजावली असून अत्यंत उत्कृष्ट अधिकारी व प्रशासनाचा दीर्घ अनुभव त्यांच्या कडे आहे. त्यांनी यापूर्वी जालना, परभणी, बुलढाणा, औरंगाबाद येथे उपशिक्षणाधिकारी तसेच मिपा येथे काम केले आहे. बीड येथे येण्यापूर्वी त्यांनी औरंगाबाद येथे महानगर पालिका येथे शिक्षणाधिकारी म्हणून काम केले आहे. जि.प.बीड येथे रुजू होताच मा.मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार साहेबांची भेट घेतली. दुपारी 4 वाजता शिक्षण विभागातील सर्व कर्मचारी यांची अत्यंत महत्वपूर्ण बैठक घेतली या बैठकीत सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा परिचय करून घेतला. या वेळी लेखाविषयक बाबी, पेन्शन, चौकशी, न्यायालयिन प्रकरणे, शिक्षकांची आस्थापना, मंत्रालयातील पत्रव्यवहार, जीबी, शिक्षण समिती, जिल्हाधिकारी बैठक,या व इतर महत्वपूर्ण विषयाचा प्रत्येक कर्मचार्‍यांकडून आढावा घेतला. सर्व कर्मचारी यांनी कार्यालयाची विहित वेळेत 100 टक्के उपस्थिती बंधनकारक असून , कार्यालय शिस्तीत चालावे, प्रत्येक संचिका तात्काळ निकाली काढाव्यात असे सांगून शिक्षण विभाग शिस्तीत व पारदर्शकपणे काम करावे कोणत्याही कर्मचारी यांना त्रास होणार नाही, मी आपणांसोबत आहे यावेळी कर्मचार्‍यांकडून कामाची व शिस्तीची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी,विस्तार अधिकारी देवराज धोत्रे, सहायक प्रशासन अधिकारी मुकाडे , श्रीम तपकीरे, कोव्हिड 19 समन्वयक राहुल चाटे, संगणक ऑपरेटर मनोज लोखंडे व कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!