बीड

कामकाजात तात्काळ सुधारणा करा, राजा रामास्वामींनी एसपी कार्यालयातील प्रत्येक विभागाची पाहणी करून कामकाजाचा आढावा घेतला, दस्ताऐवजही तपासले

उद्यापासून विभागस्तरावर जावून नागरिकांसह पोलिसांच्या अडचणी जाणून घेणार


बीड, दि. 23 सप्टेंबर : बीड पोलिस अधीक्षक पदाचा पदभार स्विकारल्यानंतर एसपी राजारामा स्वामी हे जोमाने कामाला लागले आहेत. त्यांनी बुधवारी दुपारी चार ते सायंकाळी सहादरम्यान एसपी कार्यालयातील प्रत्येक विभागाची पाहणी करून त्याठिकाणच्या कामकाजाचा आढावा घेतले, यावेळी त्यांनी काही विभागातील दस्ताऐवजही तपासले, यावेळी काही त्रुटी आढळून आल्या, यावरूनच त्यांनी आपल्या कामकाजात तात्काळ सुधारणा करा, अशा स्पष्ट सुचना यावेळी त्यांनी विभाग प्रमुखांना दिल्या आहेत, तर उद्यापासून (24 सप्टेंबर) ते विभाग, पोलिस स्टेशनस्तरावर जावून नागरिकांसह पोलिसांच्या अडचणी जाणून घेणार आहेत. उद्या केज आणि अंबाजोगाई याठिकाणी जावून त्याठिकाणच्या कामकाजाचा ते आढावा घेणार आहेत.
मागच्या चार दिवसांपुर्वीच राजारामा स्वामी यांनी बीड पोलिस अधीक्षक पदाचा पदभार स्विकारला आहे. सर्वसामान्यांना ताकत आणि न्याय देणारे तर ते आहेतच, याबरोबरच गुन्हेगारांचे कर्दनकाळ म्हणूनही त्यांची ओळख आहे. अमरावती, गडचिरोली आणि उस्माणाबाद याठिकाणी त्यांची विशेष कामगिरी राहिलेली आहे, अगदी अशा प्रकारेच त्यांची बीड जिल्ह्यातही कामगिरी राहील, असा विश्‍वास जिल्ह्यातील नागरिकांना आहे, कोणतेही काम गतीने करून नागरिकांना न्याय द्यायचा, असा सकारात्मक दृष्टीकोण आपल्या डोळ्यासमोर ठेवून ते कामाला लागले आहेत. बुधवारी दुपारी चार ते सायंकाळी सहादरम्यान त्यांनी स्वत: पोलिस अधीक्षक कार्यालयातील प्रत्येक विभागाची पाहणी केली, त्या त्या विभागात किती कर्मचारी आहेत, कोणत्या कर्मचार्‍यावर कोणती जबाबदारी आहे यासह अन्य कामकाजाचा आढावा त्यांनी यावेळी घेतला, विशेष म्हणजे काही विभागातील त्यांनी दस्ताऐवजही तपासले, यावेळी त्यांना काही त्रुटी आढळून आल्या, त्यामुळेच तर आपल्या कामकाजात तात्काळ सुधारणा करा, अशा स्पष्ट सुचना त्यांनी यावेळी विभाग प्रमुखांसह त्या विभागातील कर्मचार्‍यांना दिल्या आहेत. तसेच उद्यापासून ते विभाग आणि पोलिसस्टेशनस्तरावर भेटी देणार आहेत. प्रत्येक दिवशी ते दोन विभागाला भेटी देवून त्याठिकाणचा आढावा घेणार आहेत. यादरम्यान ते त्या ठिकाणच्या नागरिकांसह पोलिस कर्मचार्‍यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत. त्यानुसार उद्या ते केज आणि अंबाजोगाई या दोन विभागाला भेटी देणार आहेत.

..तर सर्वच यंत्रणा झाली टाईट
एसपी राजारामा स्वामी हे कोणत्याही क्षणी आपल्या विभागाला भेटी देवू शकतात, हे संबंधित पोलिस कर्मचार्‍यांना माहित होते, त्यामुळेच एसपी कार्यालयातील सगळी पोलिस यंत्रणा मागच्या तीन ते चार दिवसांपासून टाईट झाली होती, तर आज ते अंबाजोगाई आणि केज या विभागात भेटी देणार असल्यामुळे आता या दोन्ही विभागातील सर्व पोलिस यंत्रणा टाईट झाली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!