बीड, दि. 17 : प्रमाणिकरण केल्याशिवाय शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकत नाही, जिल्ह्यातील काही शेतकर्यांनी कर्जमाफीसाठी प्रमाणिकरण केलेले नाही, त्या शेतकर्यांनी तात्काळ प्रमाणिकरण करून कर्जमाफीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी केले आहे.
महात्मा जोतीबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बँका, महाराष्ट्र ग्रामीण बँक, बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आतापर्यंत 282002 एवढ्या शेतकर्यांची पीक कर्जाची खाती अपलोड केलेली आहेत. त्यापैकी 252424 शेतकन्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले आहे. अद्यापही 13979 शेतकर्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले नाही, जिल्हाधिकारी, बीड यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती गठीत केलेली असून जिल्हास्तरीय समितीकडे 3793 शेतकर्यांच्या तक्रारी प्राप्त झालेल्या असून 1734 तक्रारी प्रलंबीत आहेत. संबंधीत तालुक्याच्या तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती गठीत करणे असून या समितीकड़े 2564 शेतकन्यांच्या तक्रारी प्राप्त असून त्यापैकी 832 शेतकर्यांच्या तक्रारी निवारणासाठी प्रलंबीत आहेत. आतापर्यंत 227715 शेतकर्यांच्या खात्यावर कर्जमाफीच्या लाभाची रक्कम 1396.51 कोटी जमा झालेली आहेत. सदर योजना आधार कार्डशी संलग्न असून अद्याप ज्या शेतकन्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले नाही, अशा शेतकर्यांनी त्यांचे नजिकचे आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी मूळ आधार कार्ड व बँक खात्याचे पासबुकसह उपस्थित राहून अंगठ्याचा ठसा उमटवून प्रमाणीकरण पूर्ण करून घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय कर्जमाफीची रक्कम त्यांचे कर्ज खात्यात जमा होणार नाही. उक्त योजनेंतर्गत ज्या शेतकन्यांच्या बोटांचे ठसे उमटत नसल्यामुळे आधार प्रमाणीकरण झालेले नाही अशा शेतकर्यांनी आपले सरकार ’ सेवा केंद्र चालकास त्याचे बोटाचा ठसा वापरून आधार प्रमाणीकरण करण्याची विनंती करावी, त्यानंतर त्यांनी संबंधीत तालुक्याचे तहसीलदार तथा अध्यक्ष, तालुकास्तरीय समितीकडे स्वत: उपस्थित राहून आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, ज्या शेतकर्यांचे आधारकार्ड क्रमांक चुकीचे आहेत. त्यांनी त्यांच्या आधारकार्डची स्वसाक्षांकीत प्रत तालुका सहायक निबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयात दाखल करावी. मयत लाभाथ्यार्ंच्या वारसांनी मयताच्या नावावरील कर्ज वारसाचे नावाने वर्ग करणेसाठी आवश्यक कागदपत्रांसह संबंधीत बँक शाखेस संपर्क साधावा, ज्या मयत लाभार्थ्यांच्या वारसांनी आधार प्रमाणीकरण केलेले आहे, अशा कायदेशीर वारसदारांनी कर्जदार शेतकर्यांच्या मृत्यू प्रमाणपत्राचे स्वसाक्षांकित प्रतीसह संबंधीत तालुक्याचे उप / सहायक निबंधक , सहकारी संस्था यांच्याकडे सादर केली नसल्यास सादर करावी, तसेच मयत शेतकर्याच्या कायदेशीर वारसदाराने संबंधीत बँकेत जाऊन मयत कर्जदाराचे कर्जखात्यास वारसाची नोंद करून घ्यावी, आधार प्रमाणीकरण व वारसांच्या नावे कर्ज वर्ग करण्याची कारवाई एक आठवड्याचे आत पूर्ण करण्यात यावी, या मुदतीत आधार प्रमाणीकरण न केल्यामुळे अथवा मयताच्या वारसांनी कर्ज त्यांचे नावे वर्ग करण्याची कारवाई न केल्यामुळे संबंधितांना लाभाची रक्कम न मिळाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शेतकर्याची राहील. जिल्हास्तरीय समितीकडे ज्या शेतकर्यांच्या तक्रारी प्रलंबीत आहेत, अशा शेतकर्यांची जिल्हास्तरीय समितीकडील तक्रारीची दूरचित्रवाणीद्वारे सुनावणी घेण्यात येत असून अशा सुनावणीस उक्त नमूद कागदपत्रासह संबंधीत तालुक्याचे उप / सहायक निबंधक , सहकारी संस्था यांचे कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष राहूल रेखावार यांनी केले आहे.