बीड, दि. 14 (लोकाशा न्यूज) : श्री जैन श्वेताम्बर धर्म संघाच्या सुश्रावीका बीड निवासी, स्व. पारसमलजी यांच्या धर्मपत्नी व श्रीमान लेमकरणजी, महेंद्रकुमारजी यांच्या मातोश्री श्रीमती. प्रेमिलाबाई समदरिया यांचे वयाच्या 81 व्या वर्षी दि. 14 एप्रिल रोजी रात्री 9:13 वाजता संथारा व्रतात निधन झाले.
आचार्य श्री महाश्रमणजी यांची सुशिष्या समणी कांतिप्रज्ञाजी आणि समणी श्रृद्धाप्रज्ञाजी यांच्या मुखाने संथारा व्रतचे प्रत्याख़्यान झाले होते. त्यांचा 27 दिवसाचे तिविहार संथारा ज्यात 6 दिवसाचा संलेखना आणि 21 दिवसाचा अनशन संथारा असे 27 दिवसीय संथारा व्रत पूर्ण झाले. त्या धार्मिक वृत्तीच्या, मनमिळावू आणि शांत स्वभावी, एक आदर्श माता होत्या. असा सलग 27 दिवसांचा तिवीहार तपस्या संथारा येणे म्हणजे फार पुण्यवान आत्माचे लक्षण आहेत. दोन दिवसांआगोदर त्या ज्या रूममध्ये होत्या तेथे चंदनाचा सुगंध येत होता, असा चमत्कार घडलेला सगळ्यांनी अनुभवला. अशा या मृत्यूचाही महोत्सव मनवणार्या प्रेमिलाबाई समदरिया यांनी संथारा व्रत पुर्ण केल्याबद्दल तेरापंथी श्रावक समाज, जैन श्रावक संघ, समरथ जैन श्रावक संघ, दिगांबरी सेवा संघ आणि पुर्ण मित्र परिजणातर्फे खुप खुप अनुमोदना. डोली आज दि. 15 एप्रिल रोजी मंगळवारी सकाळी दहा वाजता त्यांच्या निवास स्थानाहून अमरधाम मोंढ़ा रोड येथे निघेल, दै. लोकाशा परिवारातर्फे खुप खुप अनुमोदना.