बीड

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

पाटोदा : लोकाशा न्यूज

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावातील उखारा शिवारात आज दि.६ गुरूवार रोजी दुपारी बिबट्याच्या हल्ल्यात श्रीमती सोजरबाई धोंडीराम बोबडे वय ६५ वर्षे या वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला असुन या परीसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. वनविभाग आणि पोलिस प्रशासनाला याची फोनवरून भगवान शिंदे यांना कळविण्यात आले आहे.

भगवान शिंदे यांच्या म्हणण्यानुसार श्रीमती सोजरबाई धोंडीराम बोबडे या दुपारी १२ वाजता शेतातील जनावराच्या गोठ्यात नेहमीप्रमाणे जात असतात. आज दुपारी ३ वाजता बिभिषण दासु शिंदे यांनी शेतातील जनावरे आणण्यासाठी जात असताना सोजरबाई यांचे प्रेत पाहीले.त्यांच्या अंगावरील जखमावरून बिबट्याने नरडीचा घोट घेतल्याचे दिसून आले.त्यांनी सोजरबाई यांच्या नातु जगन्नाथ बबन बोबडे यांना फोनवरून कल्पना दिली.त्यानंतर घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेतली. भगवान शिंदे यांनी पाटोदा वनविभागाचे अधिकारी काळे ( मो.नं.९०७५४९५७६१ ) व पोलीस प्रशासन पोलिस निरीक्षक जाधव ( मो.नं. ७७२२०३५२०९ )यांना फोन वरून कल्पना दिली. वनविभाग व पोलीस प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहचणार आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!