.
किल्लेधारुर/
किल्ले धारूर येथील अल्पावधीतच शिक्षण क्षेत्रात कार्य करत किल्ले धारूर, अवरगाव व अंजनडोह या तीन ठिकाणी क्लासेस घेत गणित विषयात विद्यार्थ्यांचा पाया भक्कम करून पूर्ण पणे या ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्राम राबवत तालुक्या,जिल्ह्यात नावलौकिक झालेल्या आरुष प्रोऍक्टिव्ह अबॅकसचे नाव देशपातळीवर गेले आहे,त्यात मैथिली शशिकांत तोडकर- प्रथम,सानवी अशोक नखाते द्वितीय,विराज जगदीश आदमाने द्वितीय, तर अक्षता अमोल ओव्हाळ तृतीय क्रमांक पटकावला आहे.त्याबद्दल प्रोऍक्टिव्ह अबॅकसचे कोल्हापूर चे संचालक गिरीश करडे सर व संचालिका सारिका करडे मॅडम यांच्या हस्ते केंद्र संचालक अविनाश जगताप,शीतल जगताप,व पालक पूजा तोडकर यांच्या समवेत सायकल, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
कोल्हापूर येथे नुकत्याच झालेल्या देश पातळी वरील अबॅकस स्पर्धेत देशातील राजस्थान, कर्नाटक ,गोवा गुजरात ,मध्य प्रदेश ,आंध्र प्रदेश तेलंगणा या राज्यंसह भारतातून एकूण 6500 विद्यार्थी सहभागी झाले होते त्यात आरुष प्रोऍक्टिव्ह अबॅकस क्लासेस च्या मैथिली तोडकर हिने 4मिनिटे 10सेकंदात १०० पैकी १०० गणिते अचूक सोडवून १०० मार्क प्राप्त केले आहेत.याच स्पर्धेत,सानवी अशोक नखाते द्वितीय,विराज जगदीश आदमाने द्वितीय,अक्षता अमोल ओव्हाळ देशात तृतीय,अभिनव अशोक राठोड देशातून सहावा,अनुश्री अशोक शिंदे – देशातून नववी,अस्मिता समाधान नखाते देशात नववी,श्रावणी संतोष आदमाने-देशातून आकराव्या स्थानावर आहे व या विद्यार्थ्यांच्या सह आरुष प्रोऍक्टिव्ह अबॅकस चे 17 विद्यार्थी देशातून 11 ते 17 क्रमांकावर आहेत या सर्व विद्यार्थ्यांसह नॅशनल कॉम्पिटिशन मध्ये सहभागी झालेल्या सर्वच गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.व सर्व विद्यार्थ्यांचे आरुष प्रोऍक्टिव्ह अबॅकस क्लासेस किल्ले धारूर चे संचालक प्रा.अविनाश जगताप,संचालिका शीतल अविनाश जगताप यांच्या सर्व पालकांनी अभिनंदन केले आहे.
आरुष प्रोऍक्टिव्ह अबॅकस सेंटरला बेस्ट सेंटर अवार्ड
किल्ले धारूर येथील आरुष प्रोऍक्टिव्ह अबॅकस सेंटर ला विद्यार्थ्यांचा उच्चांक,विद्यार्थ्यांची प्रगती,विद्यार्थी संख्या व गुणवत्ता पाहून या कॉम्पिटिशन मध्ये भारत देशातून सहभागी झालेल्या अबॅकस सेंटर मधून दिला जाणारा मोठा आणि मानाचा अवार्ड हा आरुष प्रोऍक्टिव्ह अबॅकस किल्ले धारूर ला मिळाला असून त्याबद्दल अरुष प्रो ऍक्टिव्ह अबॅकस चे संचालक प्रा.अविनाश जगताप,संचालिका शीतल जगताप यांचा प्रोऍक्टिव्ह अबॅकस चे सर्वेसर्वा गिरीश करडे सर यांनी हा अवार्ड देऊन सन्मान केला.