बीड

लोकनेत्या ना. पंकजाताई मुंडेंच्या नेतृत्वाखाली बीड जिल्हयात भाजप सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद – शंकर देशमुख, महिलांचा प्रचंड प्रतिसाद ; ना. पंकजाताईंवर व्यक्त केला विश्वास

बीड ।दिनांक ०५।
लोकनेत्या तथा राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखालील जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात भाजप सदस्य नोंदणीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत २० हजाराहून अधिक नवीन सदस्य झाले असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनी दिली. दरम्यान, या अभियानांतर्गत आज ना. पंकजाताईंनी स्वतः नागरिकांशी व्हिडिओ काॅलद्वारे संवाद साधला. या अभियानाला महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून त्यांनी ना. पंकजाताईंवर विश्वास व्यक्त केला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हयातील सर्वच तालुक्यात सध्या राज्यव्यापी सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. लोकनेत्या तथा पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना पंकजाताई मुंडे, माजी खासदार डाॅ.प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान राबविण्यात येत असून आज आष्टी तालुक्यातील कडा येथील आठवडा बाजारात व कडा शहरातील बाजारपेठेत प्रत्येक व्यापारी व बाजारातील छोट्या व्यापारी व शेतकऱ्यांना सदस्य करुन घेण्यात आले. बीड येथे भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे मंडप उभारून शहरातील नागरिकांना सदस्य करण्यात आले. माजलगाव येथे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव श्री मनोज पांगरकर यांच्या उपस्थितीत सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले. वडवणी, गेवराई, अंबाजोगाई, बीड ग्रामीण या ठिकाणी विशेष मोहीमे अंतर्गत नागरिकांना भाजपचे सदस्य करण्यात आले. बीड येथे कामगार मोर्चाच्या घरेलू महिलांच्या वतीने सदस्य नोंदणी करण्यात आली. यावेळी अभियानाचे जिल्हा संयोजक नवनाथ शिराळे, माजलगाव तालुकाध्यक्ष अरुण राऊत, प्रशांत पाटील, डाॅ. अशोक तिडके, गेवराई तालुकाध्यक्ष प्रकाश सुरवसे, ईश्वर पवार, वडवणी संजय आंधळे, अंबाजोगाईत हिदुलाल काकडे, शरद इंगळे, कामगार मोर्चा प्रदेश दादासाहेब नन्नवरे, अनु. मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अजय सवाई, शांतीलाल डोरले, भूषण पवार, केजला भगवान केदार, आष्टीत राजेंद्र शिंदे, अशोक पौळ, बाळासाहेब देशमुख, नितीन गायकवाड, दादा जगताप आदी उपस्थित होते.

ना. पंकजाताईंनी व्हिडिओ काॅलद्वारे साधला संवाद

या अभियानांतर्गत कडा येथे आज लोकनेत्या ना.पंकजाताई मुंडे यांनी व्हिडीओ काॅल द्वारे नागरिक व कार्यकर्त्यांशी संवाद साधून भाजपचे सदस्य होण्याचे आवाहन केले. एकूणच या सदस्य नोंदणी अभियानाला जिल्हयात सर्वत्र जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचे जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी सांगितले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!