बीड

मनोज जरांगेंविरोधात परळीत गुन्हा दाखल

परळी वैजनाथ दि.५(प्रतिनिधी ): मराठा आंदोलनाचे नेते(manoj jarange)मनोज जरांगे यांनी परभणी येथे झालेल्या मूक मोर्चात मंत्री (Dhanjay mundhe)धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध एकेरी भाषेचा उल्लेख करत दोन समाजात तेढ निर्माण होईल असे चिथावणीखोर वक्तव्य केले होते. त्यामुळे बदनामीकारक वक्तव्य व सामाजिक तेढ निर्माण केल्या प्रकरणी परळी (beed police)पोलीस ठाण्यात मनोज जरांगे यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, परभणी येथे झालेल्या मूक मोर्चात मराठा आंदोलनाचे नेते (manoj jarange)मनोज जरांगे यांनी भाषण करताना मंत्री धनंजय मुंडे यांचा एकेरी भाषेत उल्लेख केला होता. त्याचबरोबर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नसल्याचा इशाराही दिला होता. याच भाषणात बोलताना “मुंडया-फिंड्या हरामखोर अवलादी” असे शब्दप्रयोग केले होते. यावरून मुंडे समर्थकांमध्ये मोठा संताप व्यक्त केला जात होता. याच अनुषंगाने आज सकाळपासून परळी पोलीस ठाण्यासमोर शेकडोच्या संख्येने मुंडे समर्थक जमा झाले. मनोज जरांगे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत पोलीस ठाण्यासमोरच या जमावाने ठिय्या धरला होता. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नसल्याची आक्रमक भूमिका या शेकडो नागरिकांनी घेतली. त्यानंतर पोलीस प्रशासनाच्या वतीने तक्रार अर्ज घेत त्याबाबतची शहानिशा करण्यात आली. त्यानंतर अखेर तुकाराम बाबुराव आघाव यांच्या तक्रारीवरून मनोज जरांगे यांच्या विरुद्ध (parli police)परळी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 174 अंतर्गत असंज्ञेय अपराध(एनसीआर) अशा प्रकारचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!