राक्षसभुवन दि लोकाशा न्युज: पोलीस अधिक्षक नवनीत काँमत यांनी जिल्हाभरातील अवैध धंद्यांविरूध्द मोहिम हाती घेतली आहे. वाळु माफियांशी लागेबांधे असणाऱ्या चकलांबा पोलीस कर्मचा-यांची उचलबांगडी करण्यास सुरुयात आली आहे. गेवराई पोलीस ठाण्यासह चकलांबा, तलवाडा येथील कर्मचारी पोलीस अधिक्षकांच्या रडारवर आहेत. त्या अनुषंगाने पोलीस अधिक्षक नवनीत काँमत यांनी गोपनीणय अशा पोलीस कर्मचाऱ्यांची माहिती मागवल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. दरम्यान चकलांबा पोलीस कर्मचारी व गेवराई येथील डीवायएसपी सलग्न कार्यालयातील सर्वांचेच लाइके असे पोलीस कर्मचारी अशोक तिपाले यांची बर्दापूर (ता. अंबाजोगाई) पोलीस ठाण्यात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. तिपाले यांच्याविरुध्द या पूर्वीही वाळू प्रकरणाशी संबंधीत तक्रारी झाल्याची चर्चा आहे. त्यामुळेच तिपाले डीवायएसपी कार्यालयातील एक महत्वाचा दुवा मानला जात होता असेही बोलले जात आहे.