बीड महाराष्ट्र

आज उपमुख्यमंत्री अजित पवारही मस्साजोगला येणार; देशमुख कुटुंबांचे सांत्वन करणार

बीड, दि.21 (लोकाशा न्यूज) :- केज तालुक्यातील मसाजोग येथे आज दि.21 डिसेंबर रोजी शरद पवार दाखल झालेले आहेत. यानंतर आजच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हेही आज दुपारी मसाजोगला येणार आहेत. कै. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचे ते सांत्वन करणार आहेत. अजित पवार यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील राज शिष्टाचार विभागाला संदेश पाठवण्यात आला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रमुख शरद पवार यांना मस्साजोग येथे ज्या प्रकारचा बंदोबस्त, वाहन ताफा वापरण्यात आला आहे, तोच या ठिकाणी कायम करण्याचे आदेश पोलीस यंत्रणेने काढले आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!