बीड

भ्रष्ट मार्गाने संपत्ती कमावणाऱ्या हरिभाऊ खाडे यांना एसीबीचा दणका, दोन कोटी सात लाख 31 हजार रुपयांच्या अपसंपदा रक्कमेप्रकरणी एसीबीने केली कारवाई, खाडेंसह त्यांच्या पत्नीवर बीड शहर ठाण्यात गुन्हा दाखल


बीड, भ्रष्ट मार्गाने संपत्ती कमावणाऱ्या हरिभाऊ खाडे यांना आणखी एक मोठा दणका दिला आहे त्यांच्यावर कारवाई करत त्यांच्यासह त्यांच्या पत्नीवर बीड शहर ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
अपसंपदा कारवाई
▶️ युनिट – बीड
▶️ तक्रारदार- शंकर किसनराव शिंदे पोलीस उप अधीक्षक,नेमणुक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग. बीड.
▶️ गैरअर्जदार – 1) श्री. हरिभाऊ नारायण खाडे तत्कालीन पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा बीड. क.(वर्ग 1) सध्या निलंबित. रा. विकासवाडी पोस्ट. रेडणी,ता. इंदापूर जि. पुणे.
2) सौ. मनीषा हरिभाऊ खाडे. रा. विकासवाडी पोस्ट. रेडणी,ता .इंदापूर जि.पुणे.
▶️ अपसंपदा रक्कम-
2,07,31,358.7/- रुपये (दोन कोटी सात लाख 31 हजार पॉईंट झिरो सात. रुपये.) म्हणजेच ज्ञात उत्पन्न स्रोतापेक्षा सुमारे 116.28 टक्के जास्त अपसंपदा
▶️ * हकीगत*
आरोपी लोकसेवक श्री. हरिभाऊ नारायण खाडे पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा बीड.
(वर्ग १ ) रा. विकासवाडी पोस्ट रेडणी. ता.इंदापूर. जि. पुणे यांचे विरुद्ध दिनांक 16/05/2024 रोजी सापळा कारवाई नंतर पो.स्टे. बीड शहर शहर येथे गु.र.नं.107/2024अन्वये कलम 7,12 भ्र.प्र.अधि.1988 अन्वये दाखल गुन्हयाचे अनुषंगाने त्यांचे मालमत्तेची उघड चौकशी करण्याचे आदेश प्राप्त झाले होते.
लोकसेवक यांच्या मालमत्तेच्या उघड चौकशी दरम्यान परीक्षण कालावधीमध्ये म्हणजे (दि.10/08/2013 ते दि.16/05/2024) चे दरम्यान लोकसेवक श्री. हरिभाऊ नारायण खाडे तत्कालीन पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा बीड( वर्ग १) यांनी त्यांचे सेवा कालावधीतील परिक्षण कालावधी दरम्यान सर्व ज्ञात व कायदेशीर मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा रुपये 2,07,31,358.07 रुपये म्हणजेच(116.28 टक्के) रकमेची अपसंपदा संपादित केली आहे. एकूण अपसंपदे पैकी श्री. हरिभाऊ नारायण खाडे यांची पत्नी सौ. मनीषा हरिभाऊ खाडे यांनी सुमारे 62,79,953/-( 62 0लाख 79 हजार 953 रुपयाची) मालमत्ता स्वतःच्या नावे धारण करून लोकसेवक श्री हरिभाऊ नारायण खाडे यांना अपसंपदा संपादित करण्यासाठी सहाय्य केल्याचे (प्रोत्साहन दिल्याचे )उघड चौकशीत निष्पन्न झाले म्हणून लोकसेवक श्री हरिभाऊ नारायण खाडे तत्कालीन पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा बीड,(वर्ग 1) सध्या. निलंबित यांचे विरुद्ध कलम 13 (1)(ब) व ,13 (2)भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 व लोकसेवक श्री. हरिभाऊ नारायण खाडे यांना हेतूपुरस्सर व बेकायदेशीरपणे अपसंपदा मिळवण्यासाठी प्रोत्साहन दिले म्हणून त्यांची पत्नी. सौ. मनीषा हरिभाऊ खाडे यांचे विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन 1988 (संशोधन ,2018) चे कलम 12 प्रमाणे. आरोपी लोकसेवक हरिभाऊ नारायण खाडे व त्यांची पत्नी सौ मनीषा हरिभाऊ खाडे यांचे विरुद्ध
पो.स्टे. बीडशहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे
▶️चौकशी अधिकारी
शंकर शिंदे
पोलीस उपअधिक्षक , ला.प्र.वि. बीड
मो 9355100100

▶️तपास अधिकारी
श्री. किरण बगाटे पोलीस निरीक्षक ला. प्र.वी. बीड
मोबा. 9766237749

▶️मार्गदर्शक- श्री संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर.मो.न.
9923023361

श्री.मुकुंद अघाव , अपर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर
मो. न. 9881460103

▶️ *आलोसे यांचे सक्षम अधिकारी
मा. पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई.
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छात्रपती संभाजीनगर
*टोल फ्री 1064.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!