बीड/प्रतिनिधी
होत असलेल्या यंदाच्या निवडणुकीत ऐनवेळी चित्रच बदलले गेले,यावेळी महाविकास आघाडी आणि महायुतीचे अनेक अनुभवी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असताना माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आपला अर्ज मागे घेत पुतण्या डॉ. योगेश क्षीरसागर यांना पाठिंबा देत सर्वाना आश्चर्यकारक धक्का दिला तर मतदानाच्या दोन दिवस अगोदर गेवराई मतदार संघातील उमेदवार विजयसिंह पंडित यांनाही पाठिंबा देत दोन तरुणांना संधी देण्याचे संकेत दिले त्यामुळे आता विधानसभेत दोन तरुण आमदार आपल्याला दिसणार आहेत.
क्षीरसागर आणि पंडित कुटुंबाचे राजकीय मतभेद सर्व जिल्ह्यांनीच पाहिले आहेत परंतु दिवसेंदिवस चित्र बदलत चालले आहे ज्येष्ठ नेते माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे यावेळी विधानसभेच्या रिंगणात उभे होते सहा महिन्या अगोदरपासून जयत तयारी सुरू असलेल्या या निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित मानला जात होता मात्र त्यांचे पुतणे डॉक्टर योगेश क्षीरसागर हे देखील निवडणुकीच्या रिंगणात होते एकाच घरातून तीन क्षीरसागर निवडणुकीत उभे असल्यामुळे अनेक तर्क वितर्क लावले जात होते मात्र माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी अचानकपणे आपले उमेदवारी मागे घेत योगेश क्षीरसागर यांना पाठिंबा देऊन त्यांना विजयी करण्याचे आवाहन केले असे असतानाच गेवराई विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेले माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांचे चिरंजीव विजयराजे पंडित यांनाही माजी मंत्री क्षीरसागर यांनी पाठिंबा देऊन दोन तरुण आमदार निवडून यावेत यासाठी प्रयत्न केले आहेत, शिरसागर आणि पंडित घराण्याचे संबंध या निमित्ताने सुधारले जाणार असून यावेळी दोन तरुण आमदार विधानसभेच्या सभागृहात दिसणार आहेत बीड जिल्ह्यात महायुतीचे चार तर महाविकास आघाडीचे दोन आमदार दिसतील असे चित्र सध्या निर्माण झाले आहे,बीड,गेवराई,आष्टी आणि परळीत महायुतीला यश मिळू शकते तर केज आणि माजलगाव मध्ये महाविकास आघाडीला यश मिळू शकते असे चित्र दिसत आहे आता उद्या दि.20 रोजी होणाऱ्या मतदानानंतर दि 23 रोजी लागणाऱ्या निकालावरून सगळे चित्र स्पष्ट होणार आहे.