बीड

पंकजाताईंचा झंझावात महायुतीला तारणार, राज्यभरात घेतल्या ३५ हून अधिक सभा ; मुंडे स्टाईलने साधला जनतेशी संवाद, भाजप सोबतच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्याही उमेदवारांसाठी घेतल्या सभा

भारतीय जनता पक्षाच्या फायरब्रॅन्ड नेत्या पंकजा मुंडे सध्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यभर प्रचार दौरा करत आहेत. महायुतीच्या उमेदवारांसाठी त्यांनी आतापर्यंत ३५ हून अधिक सभा घेतल्या आहेत. प्रचाराची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली असून अवघे दोन दिवस राहिले असले तरी त्यांनी गेल्या काही दिवसात महायुतीसाठी संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला आहे. मुंडे आणि तोबा गर्दी हे समीकरण याही निवडणुकीत प्रत्येक सभांमध्ये पहायला मिळालं, त्यांचं भाषण ऐकण्यासाठी मतदारांचा प्रचंड उत्साह दिसून आला.

ऐन निवडणुकीच्या धामधुमीत पंकजा मुंडे यांच्या खांद्यावर छोटीसी शस्त्रक्रिया झाली, तशा अवस्थेतही त्यांनी दुखणं सहन करत राज्यभर प्रचार केला. महायुतीच्या प्रचाराची सुरवात त्यांनी पुण्यातून माधुरी मिसाळ यांच्यापासून केली. सिध्दार्थ शिरोळे (शिवाजीनगर पुणे), महेश लांडगे (भोसरी), कुमार आयलानी (उल्हासनगर), इकडे मराठवाड्यात तानाजी मुटकुळे (हिंगोली ), श्रीजया चव्हाण (भोकर), मेघना बोर्डीकर (जिंतूर), प्रकाश सोळंके (माजलगांव), धनंजय मुंडे (परळी), सुरेश धस (आष्टी), नमिता मुंदडा (केज), योगेश क्षीरसागर (बीड), विजयसिंह पंडित (गेवराई) त्याचबरोबर शिवाजीराव कर्डिले (राहूरी), मोनिका राजळे (पाथर्डी) सुरेश खाडे (मिरज), सचिन कल्याणशेट्टी (अक्कलकोट), सीमा हिरे (नाशिक), दिलीप बनकर(निफाड), जयकुमार रावल (सिंदखेडा), भावना गवळी (रिसोड), संजय रायमुलकर (मेहकर), शशिकांत खेडेकर (सिंदखेडराजा), आकाश फुंडकर(खामगाव), प्रताप अडसड (धामणगांव रेल्वे), हिकमत उढाण (घनसावंगी) अशा भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या अनेक उमेदवारांसाठी पंकजा मुंडे यांनी दिवस रात्र एक करून जाहीर सभा घेतल्या आणि त्यांना विजयाचे आवाहन केले.

सभांचा झंझावात महायुतीला तारणार

पंकजा मुंडे यांना केवळ ओबीसींचाच नाही तर समाजाच्या सर्व जाती धर्मात मानणारा वर्ग मोठया प्रमाणात आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची ताकद आणि त्यांना मानणारा वर्ग याचा या निवडणुकीत महायुतीला निश्चित फायदा होणार आहे. त्यांच्या सभा आपल्या मतदारसंघांत व्हाव्यात यासाठी महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराची मागणी होती. अनेकांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून तसा आग्रह देखील केला पण प्रचाराच्या मर्यादित वेळेमुळे ते इच्छा असूनही त्यांना ते शक्य होत नव्हते तरी देखील त्यांनी जास्तीत जास्त सभा देण्याचा प्रयत्न केला.

पंकजा मुंडे यांनी महायुतीला सत्तेवर आणण्यासाठी जो चंग बांधला आहे त्याला तोड नाही. प्रत्येक सभांमधून आपल्या खास ‘मुंडे स्टाईल’ने त्या जनतेशी संवाद साधतात आणि हे अपीलच लोकांना भावते.

विकास आणि केलेल्या कामांवर भाषणात भर

विरोधकांवर टीका करण्यात वेळ घालविण्यापेक्षा महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर कसे नेता येईल, इथल्या सर्व सामान्य जनतेला कसा न्याय देता येईल, जातीपातीच्या भिंती कशा दूर सारता येतील यावर पंकजा मुंडे यांचा भाषणात भर असतो. भाजपा महायुतीने केलेली कामे सर्व सामान्य लोकांपर्यंत घेऊन जाण्यात त्या यशस्वी ठरल्या आहेत. राज्यात यशस्वी झालेली लाडकी बहिण योजना, रस्ते विकास, बेरोजगारांच्या हाताला काम, शेतकरी सन्मान योजना यासह केंद्र व राज्य सरकारने राबविलेल्या योजनांची जंत्रीच त्या लोकांसमोर ठेवतात. केंद्रात नरेंद्र मोदी यांचं सरकार असल्यामुळे राज्यातही महायुतीचं सरकार आणलं तर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही असं त्या सांगतात. महाविकास आघाडी कशी अपयशी ठरली हे मात्र सांगायला त्या विसरत नाहीत. पंकजा मुंडे यांना मानणारा मोठा मतदार वर्ग, मतं वळविण्याची त्यांची किमया आणि आक्रमक व अभ्यासू भाषण शैलीचा मतदारांवर सकारात्मक प्रभाव पडत असल्याने भाजपा महायुती या निवडणूकीत बहुमताचा आकडा नक्की पार करेल असे एकूण चित्र दिसत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!