बीड

विश्वास जुना सुरेश आण्णा पुन्हा, आजवर केलंय कामच भारी धसानी आखलीय आष्टी मतदार संघाच्या विकासाची पुढची तयारी, मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलणार, जाहीरनाम्यातील विकास कामातून मतदार संघाचे वेधले पूर्णपणे लक्ष


बीड, दि. 17 :
विश्वास जुना सुरेश आण्णा पुन्हा, आजवर केलंय कामच भारी आता धसानी आखलीय आष्टी मतदार संघाच्या विकासाची पुढची तयारी, असा डंका सध्या आष्टी मतदार संघात वाजत आहे, धस आष्टी मतदार संघाचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलणार आहेत, याच अनुषंगाने जाहीरनाम्यातील विकास कामातून त्यांनी मतदार संघाचे पूर्णपणे लक्ष वेधून घेतले आहे.
सुरेश धस हे गेल्या २७ वर्षींपासून समाजाची सेवा करत आहेत, १९९९ मध्ये त्यांना जनतेने आमदारकीची प्रथम संधी दिली. त्यापूर्वी पासून त्यांनी दूध संघ, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, म्हणून सतत ‘कृतिशील राजकारण’ केले. २४ तास ३६५ दिवस ते जनतेच्या सेवेत आहेत, पुन्हा एखादा ते विधान सभेसाठी निवडणूक लढवीत आहेत, याच निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी जाहीरनाम्यातून लक्ष वेधून घेतले आहे,
तुम्ही आपल्या सुखदुःखात तुम्ही मला सामावून घेता, मला आपल्या घरातील एक सदस्य मानता हेच माझे वैभव असल्याचे त्यांनी म्हटले आहे, समाजकेंद्री राजकारण हाच माझ्या आजवरच्या सार्वजनिक जीवनाचा मूलमंत्र आहे.
माझी आजवरची कारकीर्द सर्व तुमच्यासाठी आणि तुमच्या समोर घडलेली आहे. मतदारसंघाच्या दुष्काळ मुक्तीसाठी खुंटेफळ साठवण तलावाच्या सर्वेक्षणापासून ते मंजुरी पर्यंतचे अथक परिश्रम तुम्ही पाहिले आहेत. २००३ सालच्या दुष्काळात आष्टी तालुका दूध संघाच्या माध्यमातून महाराष्ट्रात सर्वाधिक मोठी ५३ हजार जनावरांची छावणी उभी करून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
केंद्र शासनाच्या योजनेतून आष्टी तालुक्यातील ४० जुन्या मध्यम प्रकल्पातील गाळ काढून शेतकऱ्यांच्या शेतात टाकणे हा पथदर्शी प्रकल्प राबवल्यामुळे शेत जमिनीचा पोत वाढून रासायनिक खतांचा खर्च वाचल्याने आर्थिक उत्पन्नांमध्ये वाढ झाली असून तलावातील पाणीसाठा वाढला आणि परिसरातील विहिरींची पाणी पातळी वाढली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीद्वारे आजवर कोट्यावधी रूपयांचा निधी गोर-गरीब रुग्णांना मिळवून दिला आहे. संपूर्ण जग कोरोना काळात घरात थांबले असताना मी जनतेच्या काळजीने स्वतः रस्त्यावर होतो. तात्कालीन लोकप्रतिनिधी तेव्हा घरातच बसून होते. कोरोना काळात ठप्प झालेल्या रोजगार निर्मितीसाठी दीड लाख मास्क महिलांकडून बनवून घेतले आणि मोफत नागरिकांना वाटले. मतदार संघातील प्रत्येक कुटुंबांना मोफत हॅन्डवॉशचे वाटप केले. दुसऱ्या लाटेत, लाखो नागरिकांना बेड आणि रेमडिसिव्हर उपलब्ध करून दिले. दुर्दैवाने मृत्यू झालेल्या नागरिकांचे अंत्यविधी सुद्धा केले. याच दरम्यान ऊसतोड मजुरांना घराकडे येत असताना अडविण्यात आले त्या वेळी त्यांच्यासाठी अनेक गुन्हे अंगावर घेतले. संपूर्ण देशभरात राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य मार्गावर माल वाहतूक करणाऱ्या आमच्या भागातील (ट्रान्सपोर्ट) ड्रायव्हर्स यांची मोठी संख्या असून त्यांना रात्री अपरात्री येणाऱ्या अपघाता सारख्या अथवा इतर अडचणी येतात, अशा संकट प्रसंगी लोकप्रतिनीधी म्हणून हे माझे कर्तव्य असून मी संपर्कात असल्यामुळे त्यांना सतत मदत करत असतो.
स्व. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या बरोबरीने आणि नंतर आ. पंकजाताई मुंडे यांच्या समवेत शासन दरबारी झालेल्या ऊस तोडणी कामगार आणि वाहतूकदार यांच्या भाववाढ आणि कमिशन वाढ संबंधी झालेल्या दोन करारामध्ये ७० टक्के इतकी भाववाढ आणि कमिशन वाढ मिळवली आहे. ऐन दिवाळीच्या सणा वेळी ऊसतोड कामगारांच्या फडावर प्रत्यक्ष जाऊन दिवे लावून लक्ष्मीपूजन केले. ज्या वेळी मतदार संघात नरभक्षक बिबट्‌याने थैमान घातले होते. तेव्हा रात्री अपरात्री मी राना-वनात जंगलात सर्वात पुढे जाऊन शेतकऱ्यांना धीर दिला आणि मयतांच्या कटुंबीयांना अर्थसहाय्य मिळवून देत दिलासा देण्याचे काम केले. गेल्या अनेक वर्षांपासून कडा कृषी उत्पन्न बाजार समिती माझ्या मार्गदर्शनाखाली कार्य करत आहे. ही बाजार समिती आज कांदा व्यापारासाठी मराठवाड्यातील सर्वात मोठी कांदा आडत म्हणून अग्रगण्य मानली जात आहे. येथील कांद्याची निर्यात विदेशात होत
आहे. शेतकऱ्यांना अनुदानाच्या माध्यमातून सन २०१६ साली १३१९ शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १०० रुपये प्रमाणे एकूण ३८ लाख ४ हजार ६१६ रुपये इतके तर २०१८-१९ या सालामध्ये ८ हजार ९९३ शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २०० रुपये प्रमाणे एकूण २ कोटी ८७ लाख ३७ हजार ३३२ रुपये तसेच २०२२-२३ या सालामध्ये ९ हजार ४८ शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३५० रुपये प्रमाणे २१ कोटी ३२ लाख ५८ हजार ५९७ रुपये इतके अनुदान देण्याचे काम केले. यामुळे शेतकऱ्यांची उन्नती आणि शेतकऱ्यांचे हित जपण्याचे काम या माध्यमातून होत आहे.
गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) आष्टी फेज-२ च्या सर्वेक्षणाची निविदा निघाली असून लवकरच सर्व सुविधांनी युक्त असे आष्टी फेज-२ (एमआयडीसी) कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे आष्टी तालुक्यातील नवउद्योजकांचे अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण होणार असून त्यांना जागा उपलब्ध होऊन त्याद्वारे अनेक युवकांना रोजगार
मिळण्यास वाव मिळणार आहे. मी केलेल्या पाठपुराव्यामुळे शासनाने अध्यादेश काढून राज्यातील एम.बी.बी.एस., बी.डी.एस., बी.ए.एम.एस.च्या हजारो विद्यार्थ्यांना सन २०१८-१९ पासुन एकूण शैक्षणिक शुल्काच्या अर्धीच रक्कम भरावी लागली. ७ ऑक्टोबर २०१७ च्या शासन निर्णयान्वये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पात्र विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पासून लागू करण्यात आली. दरम्यान शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून उत्पन्नाची मर्यादा ८.०० लक्ष इतकी करण्यात आली. याचा फायदा हजारो विद्यार्थ्यांना झाला. त्याचबरोबर अंगणवाडी सेवीका, आशा वर्कर्स, संगणक परिचालक, सी.आर.पी. महिला, ग्रामरोजगार सेवक, यांच्या मानधनवाढीसाठी यशस्वी प्रयत्न केले. आष्टी, पाटोदा, शिरूर या तीनही शहरांचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी मी तत्कालीन भाजपा सरकारच्या काळात नगरोत्थान योजनेतून कोट्यावधी रुपयांचा निधी तीनही नगरपंचायतला उपलब्ध करुन दिला. त्यामुळे शहरांतर्गत मोठमोठे रस्ते, गटारींची कामे झाली आहेत. शेतकऱ्यांना पीक कर्ज मंजुरीसाठी टाळाटाळ
करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांना जाब विचारताना माझ्यावर गुन्हे देखील दाखल झाले परंतू शेतकऱ्यांच्या हितासाठी मी मागे हटलो नाही.
विधानपरिषदेचा आमदार म्हणून, काम करत असताना, पायाभूत सुविधा उभारण्यासाठी नगरविकास विभाग, पर्यटन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत ११७ कोटी ७५ लक्ष रुपयांच्या जम्बो निधी मंजूर करून घेतला. या विकासकामांमध्ये, प्रामुख्याने सिमेंट रस्ते, दशक्रिया विधी घाट, स्मशानभूमी, अग्निशमन वाहन, कालिका देवी सभामंडप बांधकाम, सिद्धेश्वर मंदिर परिसर सुधारणा, भुयारी नाली बांधकाम, गांधी चौक वेशीचे बांधकाम सुशोभीकरण, शहरातील विविध विकासकामे, यांसह शिरूर (का.) शहराच्या दृष्टीने, जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या ७६ कोटी ८६ लक्ष खर्चुन उभारण्यात येणाऱ्या शहर पाणीपुरवठा योजना यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
‘देवस्थाने’ ही सामाजिक आणि भौतिक सुधारणांचे माध्यम होऊ शकतात’ ही माझी नेहमीच आग्रही भूमिका राहिली आहे. म्हणूनच आष्टी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ गड सावरगाव, पिंपळेश्वर देवस्थान आणि माऊली मंदीर, भैरवनाथ देवस्थान वाळुंज, रेणूकामाता मंदीर बेलगांव, नागनाथ देवस्थान नागतळा, पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र मीराबाई आईसाहेब संस्थान महासांगवी, अश्वलिंग देवस्थान पिंपळवंडी, शिरूर (का.) तालुक्यातील सिद्धेश्वर देवस्थान आणि कालीका देवी शिरूर, जगदंबा देवी मंदीर राक्षसभुवन, प‌द्मावती देवी मंदीर आनंदगांव, या सर्व देवस्थानासाठी आतापर्यंत माझ्या पाठपुराव्यातून भरघोस निधी मंजूर झाला असून, त्या माध्यमातून सर्व देवस्थानांचा कायापालट झालेला असून भाविक भक्तांना मोठ्या प्रमाणावर सोयी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत आणि भविष्यातही होणार आहेत.
ग्रामीण भागातील खासगी संस्थेच्या शाळांमधून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत नसल्यामुळे, ग्रामीण भागातील असलेल्या जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असून शैक्षणिक गुणवत्ता अभियान आणि व्ही. रमणी पॅटर्नची अंमलबजावणी करणार असून शक्य त्या ठिकाणी गोर- गरीब विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परिक्षा प्रशिक्षण केंद्र सुरू करणार आहे. तसेच आष्टी आणि पाटोदा तालुक्यात मोठ्या प्रमाणावरील वन्य जीव विभाग अंतर्गत असलेल्या पठार आणि उतार क्षेत्रावरील ग्लॅरीसिडीया ही वनस्पती काढून त्या जागी भारतीय प्रजातीच्या असलेल्या वृक्षांची लागवड व संगोपण करणार असून त्या ठिकाणी पर्यटनकेंद्र उभारणीसाठी प्रयत्न करणार आहे.
सततच्या दुष्काळी छायेतील असलेल्या पाटोदा व शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांना कायम स्वरूपी सिंचन सुविधा मिळावी यासाठी पश्चिम वाहिनीचे ५५ टीएमसी पाणी तुटीचे असलेल्या गोदावरी खोऱ्यात येणार असून मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
ओव्हरफ्लोचे ५० एम.सी. एफ.टी पाणी सीना प्रकल्पामध्ये सोडून तेथून ते मेहकरी प्रकल्पामध्ये सोडण्याच्या सीना मेहकरी प्रकल्पाचे योजनेचे काम माझ्याच कार्यकाळात ९७ टक्के पूर्ण झाले होते.
दुष्काळी आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या खुंटेफळ साठवण तलावामध्ये मराठवाड्‌याच्या हक्काचे ५.६८ टीएमसी पाणी येणारच असल्यामुळे ऊसाचे क्षेत्र वाढणार आहे. त्यामुळे ऊस गाळप करण्याची समस्या होऊ नये म्हणून आपण साखर कारखान्याची उभारणी करणार असून त्या कामाची सुरुवात केली आहे.
प्रत्येक निवडणूक आपले भविष्य घडविणारी असते. मला भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षाने अधिकृत उमेदवारी दिली आहे. महिला, युवक, शेतकरी, कष्टकरी मजूर, विद्यार्थी, उद्योजक यांच्या उत्कर्षासाठी आपल्या महायुती सरकारने न भूतो न भविष्यती अशा योजना राबवून, विकासाचे एक नवे पर्व खुले केले आहे. आपल्या सर्वांना हाच वारसा पुढे घेऊन जायचे आहे. त्यासाठी आपल्या सर्वांची साथ आवश्यक आहे. म्हणूनच येत्या २० नोव्हेंबर रोजी माझ्या “कमळ” या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी कराल आणि मला तुमच्या सेवेची पुन्हा एकदा संधी द्याल, असा विश्वास या जाहीरनाम्यातून सुरेश धस यांनी व्यक्त केला आहे.

खुंटेफळ प्रकल्प आष्टीला तारणार
खुंटेफळ साठवण तलावाचे जलवाहिनी कामाच्या तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता मंजूर करणे विषयी मी आग्रही मागणी केल्या नंतर उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या कामाच्या एकूण ११ हजार ७२६ कोटी रु. पैकी आष्टी योजनेसाठी २८०१ कोटी रु.च्या कामास प्रशासकीय मान्यता दिली. त्यानंतर दि. २७ डिसेंबर २०२२ रोजी उजनी जलाशय ते खुंटेफळ साठवण तलाव या थेट पाईपलाईनच्या निविदा काढणे बाबत मी केलेल्या या मागणीचा सकारात्मक विचार करून शासनाने मागणी मंजूर केली आणि दि.१ जानेवारी २०२४ रोजी उजनी जलाशय, शिंपोरा ते खुंटेफळ साठवण तलाव थेट जलवाहिनी या कामाची बी-१ निविदा प्रसिद्ध करण्यात आली. दि. १५ मार्च २०२४ रोजी शिंपोरा ते खुटॅफळ साठवण तलाव या जलवाहिणी कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आले. दि. २५ मार्च २०२४ रोजी प्रत्यक्ष कामास सुरूवात झाली. आष्टी तालुक्यातील दुष्काळी परिस्थीतीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी अत्यंत महत्वाकांक्षी असलेला हा प्रकल्प आष्टी तालुक्यासाठी वरदान ठरणारा आहे आणि या तलावाच्या संकल्पनेपासून पूर्णत्वापर्यंत चे काम माझ्या आजवरच्या
पाठपूराव्या मुळे अंतीम टप्यात असल्याचेही धस यांनी म्हंटले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!