बीड

बारा हजारांची लाच घेताना बाल कल्याण समितीच्या सदस्यास रंगेहाथ पकडले, बीड एसीबीची बीडमध्ये कारवाई

बारा हजारांची लाज घेताना बाल कल्याण समितीच्या सदस्याला रंगेहात पकडण्यात आले आहे ही कारवाई बीड एसीबीने बीडमध्ये केली आहे

▶️ युनिट- बीड
▶️ तक्रारदार- पुरुष, वय- 27 वर्ष,रा.किट्टी आडगाव, बीड
▶️ आलोसे – सुरेश प्रभाकर राजहंस वय 40 वर्ष व्यवसाय बाल कल्याण समिती सदस्य बीड (मानधन तत्वावर )राहणार शिंदे नगर फेज वन कॅनल रोड बीड
➡️लाच मागणी दिनांक – 21/10/2024
▶️ लाच स्वीकृती दिनांक:21/10/2024
▶️ लाच मागणी 50,000/-रुपये तडजोड अंती 12000 रुपये
➡️ लाच स्विकारली दि.21/10/2024
➡️ लाच स्विकारली – 12000/-रुपये

▶️ ठिकाण- बाल कल्याण समिती चे कार्यालय चांदमोरी धानोरा रोड.बीड

▶️ कारण – यातील तक्रारदार यांची मैत्रीण महिला बाल स्वाधार गृहात दाखल असून तिला तक्रारदार यांनी सोडवण्या करिता दि.18/10/2024 रोजी अर्ज केला होता त्यावरून सदरील मुलीला तक्रारदार यांचे ताब्यात देण्यासाठी बालकल्याण समितीचे सदस्य श्री सुरेश राजहंस यांनी स्वतः करिता व समितीतील इतर सदस्य करिता 50हजाराची लाच मागणी करून तडजोडांती 12 हजार रुपये घेण्याचे पंचा समक्ष मान्य करून सापळा कारवाई दरम्यान 12000 रुपये लाच रक्कम स्वतःघेताना श्री सुरेश राजहंस याना बाल कल्याण समिती चे कार्यालयात लाचेच्या रकमेसह रंगेहाथ पकडले आसून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.पो.स्टे.शिवाजी नगर ,बीड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

▶️ सापळा अधिकारी
युनूस शेख, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि.बीड
मो.क्र. 9765000784

▶️मार्गदर्शक- श्री संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर.
9923023361

श्री.मुकुंद अघाव , अपर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर मो. क्र.9881460103
➡️ पर्यवेक्षण अधिकारी – श्री.शंकर शिंदे, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. बीड मो. न. 9355100100.

➡️सापळा पथक – पोलीस अंमलदार, भरत गारदे, अविनाश गवळी, गणेश मेहेत्रे ला. प्र. वि. बीड
जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांचेकडे कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांचे वतीने खाजगी इसम कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ अमाचेशी संपर्क साधावा.
भ्रष्टाचारा संबंधित काही तक्रार असल्यास
*टोल फ्री क्र:- 1064
*मा.पोलीस अधीक्षक, लाप्रवि.छत्रपती संभाजीनगर :-9923023361* पोलीस उपाधीक्षक शंकर शिंदे ला. प्र. वि. बीड
मो.9355100100
वर संपर्क साधावा.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!