बीड

खा. बजरंग सोनवणे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र!, ट्रेनी शिक्षकांचा कालावधी वाढविण्याची केली मागणी

चिचोली माळी/प्रतिनिधी
शासनाने ‘मुख्यमंत्री’ युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंर्गत ट्रेनी शिक्षक पदभरती केलेली आहे.त्याचा कालावधी सहा महिन्यांचा आहे.परंतू या कालावधीत शैक्षणिक वर्ष पूर्ण होत नाही. त्यामुळे वाढीव कालावधी देवून निवड झालेल्या ट्रेनी शिक्षकांना दिलासा द्यावा.अशा मागणीचे पत्र खा.बजरंग सोनवणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.
राज्य शासनाकडून ‘मुख्यमंत्री’ युवा कार्य प्रशिक्षण योजना कार्यान्वित आहे. त्या योजनेच्या माध्यमातून राज्यातील जिल्हा परिषद शाळेत ट्रेनी शिक्षकांची पदभरती करण्यात आली आहे.मात्र शैक्षणिक वर्ष पाहता, सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण होत नाही.त्यामुळे ‘मुख्यमंत्री’ युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी वाढविणे आवश्यक आहे.असे निवेदन प्रशिक्षणार्थींनी माझ्याकडे दिले आहे.त्या निवेदनातून त्यांनी विनंती केली आहे की, खासदार या नात्याने आमची मागणी राज्य सरकारकडे कळवावी आणि ट्रेनी शिक्षकांना न्याय मिळवून द्यावा.
बीडसह राज्यातील ट्रेनी शिक्षकांचा हा प्रश्न लक्षात घेता, त्यांची मागणी योग्य आणि रास्त आहे.त्यामुळे ‘मुख्यमंत्री’ युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी पूर्ण होण्यासाठी संबंधित विभागास आदेशीत करावे.असे पत्र खा.बजरंग सोनवणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.

चौकट
बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळावे, त्यासाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री’युवा कार्य प्रशिक्षण योजना राज्यात सुरु केली.परंतु सदरील योजना राबवित असतांना ती पूर्णपणे यशस्वी होते का? हे पाहणे महत्वाचे आहे. मात्र प्रशिक्षणार्थी यांच्या निवेदनातून स्पष्ट होते की, या योजनेचा कालावधी शैक्षणिक वर्षात पूर्ण होत नाही. ही बाब लक्षात घेवून खा. बजरंग सोनवणे यांनी मुख्यमंत्री यांना पत्र पाठवून कालावधी वाढविण्याची मागणी केली.त्यामुळे ट्रेनी शिक्षकांना दिलासा मिळणार आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!