बीड,
भगवान भक्ती गडावरील दसरा मेळाव्यात पालकमंत्री धनंजय मुंडे तडाखेबाज भाषण केले. मी आणि पंकजाताईंनी 12 वर्षाचा प्रारब्ध भोगला. तो आता संपला असून आम्ही दोघे एकत्र आलो आहोत. पंकजाताई यांनी स्व.गोपीनाथ मुंडे साहेबांची परंपरा चालू ठेवली, शिवाजी महाराजांनी एका जातीसाठी राजकारण केले नाही, 18 पगड जातीसाठी स्वराज्य उभे केले. संत भगवान बाबांनी ती परंपरा पुढे चालविली. इथे आलेला प्रत्येक जण वेगवेगळ्या जाती धर्माचा आहे. हा दसरा मेळावा सर्व जाती धर्माचा आणि विचारांचा मेळावा आहे. भगवानगडाच्या भूमिपूजनाला तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आले होते. त्यांनीच या गडाचे भगवानगड असे नामकरण केले.भगवान गड, गोपीनाथ मुंडे साहेब, पंकजाताई, माझ्या, तुमच्या सर्वांच्या नशिबात संघर्ष आहे दसरा मेळावा फक्त बीडमध्ये होतो असे नाही.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा जगात प्रसिद्ध आहे. स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा दसरा मेळावा सुरू केला आहे. अनेक संकटे आली असतानाही पंकजा ताईंनी दसरा मेळावा सुरु ठेवला. पण वेगळा दसरा मेळावा सुरू करण्याचा मी कधी वेगळा विचार केला नाही. दसरा ज्याला माहिती त्याला प्रभू रामचंद्र माहिती असावेत. गेले बारा वर्षे जे झाले ते घडून गेले. आता माझ्या बहिणींच्या पाठीशी उभा राहण्यासाठी मी भगवान गडावर आलो आहे. भगवानगडावर येऊन मला आज आनंद झाला आहे. तसा तो पंकजाताईना ही झाला आहे पण उपस्थित लोकांच्या डोळ्यात मी तो आनंद पाहतोय, असे हे गौरव उद्गार धनंजय मुंडे यांनी काढले. तसेच एखादा नविन दसरा मेळावा सुरू करून या पवित्र दसरा मेळाव्याचे महत्त्व कोणी संपवू शकत नाही, असा इशारा सुद्धा दिला. यावेळी गडावर उपस्थित लोकांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना शायरीम्हणण्याचा आग्रह केला. सुरवातीला गडाच्या पवित्र व्यासपीठावरून शायरी म्हणण्यास त्यांनी नकार दिला. पण लोकांच्या आग्रहावरून धनंजय मुंडे यांनी ‘तुम लाख कोशिश करो हमे हराने की…हम जब जब भी बिखरेंगे, दुगनी रफ्तार से निखरेंगे…. ही शायरी म्हटली तेव्हा जल्लोष झाला.