बीड -बीड जिल्ह्यासह राज्यभरात सहकार सम्राट नावाने ओळख असलेल्या रामकृष्ण बांगर यांचा खरा चेहरा उघडं होतं आहे. महात्मा फुले अर्बन बँकेसह चौदा सहकारी संस्था मध्ये चौदा कोटी रुपयांचा अपहार केल्याचे उघडं झाले आहे. बांगर यांच्यासह 41लोकांवर गुन्हे दाखल झाले असून सत्यभामा बांगर यांना अटक झाली आहे.
रामकृष्ण बांगर, सत्यभामा बांगर, बाळा बांगर यांनी महात्मा फुले अर्बन बँक, डेअरी, शैक्षणिक संस्था स्थापन केल्या होत्या. मागील तीस चाळीस वर्षेपासून बांगर यांचे साम्राज्य अबधित होते. वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या आशीर्वादाने बांगर यांनी करोडो रुपयांचा अपहार केला. मात्र त्यावर कारवाई झाली नाही. अखेर पापाचा घडा भरला अन त्यांच्यावर पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्या पत्नी सत्यभामा बांगर यांना अटक झाल्याचे सांगितले जात आहे.