बीड

आजच्या मराठा आरक्षण जागर घोंगडी बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित रहा – सी.ए.बी.बी. जाधव

बीड दि. 8 (प्रतिनिधी) : गेल्या वर्षभरापासून सुरू असलेले संघर्ष योद्धा मा मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन अद्यापही सुरूच आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मागे न हटणार असा पण संघर्ष योद्धा मा मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे. याच अनुषंगाने संघर्ष योद्धा मा मनोज जरांगे पाटील सर्वत्र घोंगडी बैठकीचे आयोजन करत आहेत. बीड
शहरामध्ये आज दुपारी शहरातील छत्रपती संभाजी क्रीडांगण मैदान याठिकाणी दुपारी 12 वाजता मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत घोंगडी बैठक आयोजित करण्यात आली आहे. याच बैठकीची पूर्ण तयारी झाली असून बीड मतदारसंघातील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन बी.बी.जाधव यांनी केले आहे.
मराठा समाजाचे आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात असून समाजाने संघर्ष योद्धा मा मनोज दादा जरांगे पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी घरातील लहान मुले वृद्धासह उपस्थित राहावे. मा मनोज जरांगे पाटील यांच्या बीड जिल्ह्यामध्ये मतदारसंघ निहाय घोंगडी बैठका सुरू आहेत. यामध्ये काल परळी याठिकाणी घोंगडी बैठक संपन्न झाली असून परळीतील मराठा बांधवांनी दुपारी परळीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत केले. तसेच मनोज जरांगे पाटील यांची बीड शहरात आज दुपारी घोंगडी बैठक होत आहे. या बैठकीला मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. याच बैठकीच्या अनुषंगाने बीड येथील समन्वयकांनी बैठकीची जय्यत तयारी केली आहे. याच बैठकीला समाजबांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन बी.बी. जाधव यांनी केले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!