बीड

बीड विधानसभेच्या रिंगणात आणखी एक क्षीरसागर, महिला म्हणून संधी दिली तर बीड विधानसभा लढणार – डॉ. सारिका क्षीरसागरांनी स्पष्ट केली भुमिका


बीड, दि. 27 (लोकाशा न्यूज) : बीड विधानसभेच्या रिंगणात अगोदरच काका आणि दोन पुतणे अशा तीन नावांची चर्चा सुरू आहे. याच दरम्यान आता पुन्हा एका क्षीरसागर कुटुंबातील सदस्याची बीड विधानसभेच्या उमेदवारीच्या चर्चेत एन्ट्री केली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून ही उमेदवारी असण्याची शक्यता आहे. दरम्यान अजित पवार यांनी संधी दिल्यास निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची भूमिका डॉ. सारिका क्षीरसागर यांनी मांडली आहे.  माजी मंत्री काका जयदत्त क्षीरसागर, विद्यमान आमदार पुतण्या संदीप क्षीरसागर, नगरसेवक पुतण्या डॉ. योगेश क्षीरसागर यांची  बीड विधानसभेसाठी तयारी सुरु आहे. त्यात आता डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या पत्नी डॉ. सारिका क्षीरसागर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. मात्र आगामी काही दिवसात उमेदवारी निश्चित झाल्यानंतर बीड मतदार संघातील चित्र स्पष्ट होणार आहे.  दरम्यान सारिका क्षीरसागर यांनी सांगितले, कि खूप कमी महिला राजकीय क्षेत्रात सक्रीय असतात. त्यामुळे चर्चा जास्त होत असेल, पण माझ्यासारख्या अनेक महिला पक्षात सक्रीय आहेत. उमेदवारीबाबत अजितदादांचा निर्णय असणार आहे. त्यांनी जर मला सांगितले की इथून महिला उमेदवार पाहिजे तर मी का तयार नसेन? असे वक्तव्य बीड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या डॉ. सारीका क्षीरसागर यांनी केले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!