बीड

अंबाजोगाईतील अवैध कत्तलखान्यावर छापा, छापेमारीत 6 लाख 60 हजार रुपये किंमतीचे गोवंशीय मास जप्त, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या पथकाची मोठी कारवाई


अंबाजोगाई, दि. 27 (लोकाशा न्यूज) : अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या पथकाने आंबेजोगाई येथे चालत असलेल्या अवैध कत्तलखान्यावर छापा टाकून 6,60,000 रुपये रुपये किमतीचे गोवंशी जनावरे व गोवंशीय मास जप्त करत धडाकेबाज कामगिरी केली आहे.
सविस्तर वृत्त असे की,  दि. 27 ऑगस्ट रोजी अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके  यांना माहिती मिळाली की, अंबाजोगाई शहरामधील बाराभाई गल्ली येथे काही इसम गोवंसीय जनावरांची कत्तल करून त्यांची मांसाची विक्री करत आहेत. तसेच सदर ठिकाणी काही गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी आणून ठेवलेली आहेत. सदर माहितीच्या अनुषंगाने त्यांनी तत्काळ अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील अधिकारी व अंमलदार तसेच पोलीस स्टेशन आंबेजोगाई शहर व ग्रामीण येथील अधिकारी व अंमलदार यांनां आदेशित करून त्या ठिकाणी जाऊन छापा मारण्यास सांगितले. सदर ठिकाणी जाऊन छापा मारला आसता त्यांना काही इसम गोवंशीय जनावर खाली पाडून त्याची कत्तल करत असताना मिळून आले. सदर अधिकारी आणि कर्मचारी यांनी त्यांना पकडून त्यांचे नाव-गाव विचारले असता त्यांनी मिरार इब्राहिम कुरेशी, तोफिक लायक कुरेशी, अरबाज नवीन कुरेशी, असीम नाजीर कुरेशी,मुक्तार सतार कुरेशी सर्व रा. बाराभाई गल्ली अंबाजोगाई असे सांगितले. त्या ठिकाणाहून पाच जण पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांची नावांची चौकशी केली असता ते पुढील प्रमाणे मोहम्मद युनुस कुरेशी, नाजीर कुरेशी, लोकमान अजीम कुरेशी,फारुख शेरू कुरेशी, राजू नाजर कुरेशी असे समजले. वरील आरोपीताकडून एकूण सहा लाख साठ हजार रुपयांचा गोवंशी मौस व 11 गोवंसीय जनावरे तसेच पाच मोटरसायकल, एक तीन चाकी मालवाहू पिवळ्या रंगाचा ऑटो व एक बजाज कंपनीचा कळ्या रंगाचा तीन चाकी आटो मिळून आले. असा मुद्देमाल पंचा समक्ष जप्त केला. सदर ठिकाणी अकरा गोवंशी जनावरे हे गोशाळेत सोडून व मिळालेले बाराशे किलो वजनाचे मांस हे नगरपरिषद साह्याने नष्ट केले. सदरची कारवाई अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.विनोद घोळवे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोह राठोड, पोहो अनिल दौंड, रामेश्वर सुरवसे, राजू पठाण,तानाजी तागड त्याचबरोबर पोलीस स्टेशन अंबाजोगाई शहर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे, पोलीस उपनिरीक्षक पवार, त्याचबरोबर आंबेजोगाई ग्रामीण येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप अंबाजोगाई पोलीस स्टेशन शहर येथील गुट्टे नागरगोजे, चादर, त्याचबरोबर आंबेजोगाई ग्रामीण येथील खंदारे देशमाने मुरकुटे राऊत  यांनी केली. सदरच्या आरोपीतांवर अंबाजोगाई शहर येथे कलम 325 कलम 271 भारतीय न्याय संहिता व सह कलम 11 एक डी 11(1) ई-प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 व महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5र (1),5( र) 2,5 (ल) 9, 11,6, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 119 प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!