बीड

सपोनी नारायण एकशिंगे व तहसीलदार संदीप खोमणे यांचीवाळू तस्करांवरती संयुक्त दबंग कारवाई, तीन कोटीचा मुद्देमाल जप्त, वाळू तस्कराचे धाबे दणाणले

सपोनी नारायण एकशिंगे व तहसीलदार संदीप खोमणे यांचीवाळू तस्करांवरती संयुक्त दबंग कारवाई, तीन कोटीचा मुद्देमाल जप्त, वाळू तस्कराचे धाबे दणाणले
सविस्तर वृत्त असे की, चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे तसेच गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे यांना गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली होती की, चकलांबा पोलिस ठाणे हद्दीतील राक्षस भवन येथील नदीपात्रात सहा ते सात हवा वाळू भरण्या कामी येणार आहेत त्याप्रमाणे सापळा लावून सिताफिने गावकऱ्यांच्या मदतीने छापा टाकला असता. वाळू ची तस्करी करणे कामी आलेले सात हायवा पकडण्यात यश आले. सदरचे हायवा हे पोलीस संरक्षणात एसटी स्टँड गेवराई येथे लावून पुढील दंडात्मक कारवाई कामी तहसील कार्यालय गेवराई यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.
सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर साहेब, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर साहेब, उपवागीय पोलीस अधिकारी गेवराई यांच्या मार्गदर्शनाखाली चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नारायण एक शिंगे, गेवराई तहसील चे तहसीलदार संदीप खोमणे साहेब तसेच टीम, पोलीस उपनिरीक्षक तांगडे, पोलीस हवालदार येळे, पोलीस शिपाई घोंगडे, पोलीस शिपाई सुरवसे, तसेच चालक गरजे आदींनी केली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!