बीड

नारेगात लाचखोरांनी बाजार मांडला, तुतीची फाईल करण्यासाठी दहा हजाराची लाच घेताना पंचायत समितीच्या तांत्रिक सहाय्यकाला पकडले, दोघांवर गुन्हा दाखल

बीड दि. 26 : रेशीम उद्योग विकास योजना राबवण्याकरिता तुती झाडांची लागवड करायची होती. यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत फाईल करण्यासाठी गेवराई पंचायत समितीतील तांत्रिक सहाय्यकाने दहा हजाराच्या लाचेची मागणी केली. ही लाच स्वीकारताना खाजगी इसमाला छत्रपती संभाजीनगर येथील एसीबीने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवारी (दि.26) दुपारच्या सुमारास गेवराई शहर करण्यात आली.

लाचखोर संदीप रोहिदास राठोड (वय 34, व्यवसाय-नोकरी, तांत्रिक सहाय्यक, रेशीम उद्योग विकास योजना बीड नेमणूक, पंचायत समिती गेवराई, जिल्हा बीड) व खाजगी इसम चंद्रकांत धर्मराज शेळके (वय 25, व्यवसाय फिटर, माऊली ऑटो गॅरेज, रा.पंचाळेश्वर ता.गेवराई, जि बीड) या दोघांना पकडले आहे. तक्रारदार यांची शेतीमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रेशीम उद्योग विकास योजना राबवण्या करिता तूती झाडांची लागवड करायची होती. त्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत फाईल दाखल करून मंजूर करण्यासाठी इंजिनियर राठोड याने तक्रारदार यांच्याकडे पंच साक्षीदार समक्ष दहा हजार रुपये लाचेची मागणी करून खाजगी ईसम यांच्याकडे देण्याचे सांगितले. खाजगी इसम यांनी पंच साक्षीदार समक्ष दहा हजार रुपये लाचेची रक्कम स्वतः स्वीकारली. म्हणून खाजगी इसम यांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपअधीक्षक संगीता पाटील, पोलीस हवालदार सुनील पाटील, पोअं विलास चव्हाण, सी. एन.बागुल यांनी केली. बीड एसीबीच्या नियोजनात ही कारवाई करण्यात आली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!