बीड

१५ हजारांची लाच घेताना लाईनमनसह हॉटेल चालकाला पकडले

बीड-मागच्या काही महिन्यापासून जिल्ह्यातील लाचखोरांवर एसबीकडून मोठया कारवाया सुरु असताना आता आणखी एका प्रकरणात १५ हजारांची लाच घेताना महावितरणचा लाईनमन व एका हॉटेल चालकाला पकडण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंजेरी फाटा येथे ही कारवाई केली.
तक्रारदार यांचे मंजिरी फाटा पाली येथे व्यावसायिक शटर असून तेथील मीटर जळाल्याने तक्रारदार याने नवीन मीटर बसून देण्यासाठी अर्ज केला होता.तसेच नवीन मीटर बसवून वीज चोरीचा अतिरिक्त दंड न लावण्यासाठी लाईनमन श्रीमंत जीवराज मुंडे (लाईनमन) याने २० हजारांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती यात १५ हजारांची रक्कम ठरल्यानंतर ही रक्कम मंजेरी फाटावरील खाजगी हॉटेल चालक सय्यद आयुब मोहंमद (वय-४२) हा स्वीकारताना रंगेहात पकडला. बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणी लाईनमन श्रीमंत मुंडे व हॉटेल चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई
पोलीस अधिक्षक संदीप आटोळे, अप्पर पोलीस अधिक्षक मुकुंद आघाव, पोलीस उपअधिक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुलाब बाचेवाड (पोलीस निरीक्षक), सुरेश सांगळे, अमोल खरसाडे, संतोष राठोड, श्रीराम गिराम, गणेश म्हेत्रे, सुदर्शन निकाळजे यांच्या वतीने करण्यात आली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!